• Download App
    कुंभमेळ्यातील साधू प्रसादासारखा कोरोना वाटतील; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांच्या वक्तव्यावरून वाद mumbai mayor kishori pednekar creates contraversy over remarks on sadhus%

    कुंभमेळ्यातील साधू प्रसादासारखा कोरोना वाटतील; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांच्या वक्तव्यावरून वाद

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – मुंबईतला कोरोना फैलाव आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊनचा पर्याय निवडावाच लागेल, असे सांगत असताना मुंबईच्या महापौर नवा वाद निर्माण करून बसल्यात. त्यांनी कुंभमेळ्यातील साधूंबाबत वादग्रस्त विधान केले आहे. mumbai mayor kishori pednekar creates contraversy over remarks on sadhus

    कुंभमेळ्यातील साधू हरिव्दारहून जिथे जातील तिथे प्रसादासारखा कोरोना वाटतील, असे विधान महापौर किशोरी पेडणेकर यांनी केल्याने हा वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियातून त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रसाद या शब्दावर नेटकऱ्यांचा आक्षेप आहे.

    मुंख्यमंत्र्यांनी कलम १४४ संचारबंदी नियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू केले पण तरीही कोरोना आटोक्यात येताना दिसत नाही. यावरच किशोरी पेडणेकर यांनी शहराच्या प्रथम नागरिक म्हणून आपली भूमिका मांडली आहे. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहाता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा, अशी सूचना किशोरी पेडणेकर यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लागू केल्यानंतर विरोधी पक्षांनी लॉकडाऊनवर मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे.

    मुंबईतल्या ५ टक्के बेजबाबदार नागरिकांमुळे उरलेल्या ९५ टक्के नागरिकांना अडचण होत असल्याची टीका पेडणेकर यांनी केली. त्या म्हणाल्या की, “९५ टक्के मुंबईकर कोरोना नियमावलीचे पालन करतात. पण ५ टक्के लोक निर्बंधांचे पालन करीत नाहीत. त्यांच्यामुळे इतरांना अडचण होते आणि कोरोनाचा धोका वाढतो. यासाठीच सध्याची परिस्थिती पाहाता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा.

    mumbai mayor kishori pednekar creates contraversy over remarks on sadhus

    Related posts

    Maharashtra government : कर्जमाफीतील पारदर्शकतेसाठी मोठा निर्णय; शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हजर राहूनच करावी लागणार KYC; मोबाईल ओपीटीद्वारे आधार प्रमाणीकरण बंद

    एकट्या धर्मेंद्र प्रधानांची गच्छंती; पण राहुल, पवार, ठाकरे बंधूंसकट विरोधकांना मोदी सरकार हटविल्याची आनंदाची उकळी!!; वस्तुस्थिती काय??

    CJI नी मीडिया रिपोर्टिंगवर नाराजी व्यक्त केली; म्हटले- सुनावणीस नकार दिला नाही, सर्वोच्च न्यायालयात कोणतीही याचिका दाखलच झाली नव्हती