विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या बहुचर्चित निवडणुकीत पराभव काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा झाला आहे, पण त्यावरच्या एकाचढ एक प्रतिक्रिया मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देताना दिसत आहेत…!! MLC elections; congress and shiv sena candidates defeated, but NCP leaders are more reactive
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे दिल्लीत आहेत. राहुल गांधी यांच्या बरोबर ते महात्मा गांधी पुतळा ते विजय चौक या मोर्चामध्ये सामील झाले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ट्विटर हँडलवर सध्या शुकशुकाट आहे. म्हणजे त्यांचे विधान परिषद निवडणुकीच्या बद्दल काही ट्विट अद्याप तरी आलेले नाही. (दुपारी दोन वाजेपर्यंत) पण राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ट्विट करून विधानपरिषद निवडणुकीत भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर राज्यसभेत जसे खुल्या पद्धतीने मतदान होते, तसा कायदा जर राज्य सरकारला अधिकार असेल तर आम्ही करू. अधिकार नसेल तर केंद्र सरकारकडे तसा कायदा करण्याची मागणी करू, असे ट्विट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील भाजपने घोडेबाजार करून विधान परिषद निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे.
त्याला चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रत्युत्तरही दिले आहे. भाजप हरली तर विरोधकांचे “तत्वज्ञान” जिंकले आणि भाजप जिंकली तर ईव्हीएम मशीनमुळे जिंकली, असे विरोधक नेहमीच म्हणत असतात. भाजपने घोडेबाजार केला… मग महाविकासआघाडी कडचे पैसे संपले होते का??, असा खोचक सवालही चंद्रकांतदादांनी केला आहे.
पण एकूण नागपुरात काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला आहे आणि अकोला वाशिम मध्ये शिवसेनेचे उमेदवार बजोरिया पराभूत झाले आहे पण त्याबद्दल जास्त आवाज काढताना मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नेतेच दिसून येत आहेत…!!
MLC elections; congress and shiv sena candidates defeated, but NCP leaders are more reactive
महत्त्वाच्या बातम्या
- Terrorist Attack : श्रीनगर दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका पोलिसाचे निधन, आतापर्यंत ३ शहीद
- वेदमूर्ती डॉक्टर भीमराव कुलकर्णी यांचे डोंबिवलीमध्ये निधन
- हिवाळी अधिवेशन : ईडी-सीबीआय संचालकांचा कार्यकाळ वाढणार! राज्यसभेत आज दोन महत्त्वाची विधेयके मांडली जाणार
- राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधकांचा मोर्चा; पण तृणमूळ काँग्रेसचे खासदार मोर्चाऐवजी संसदीय कामकाजात सहभागी!!