• Download App
    Mask again for Sai devotees in Shirdi

    शिर्डीत साई भक्तांसाठी पुन्हा मास्कसक्ती; मंदिर प्रशासनाने जारी केले नवे नियम

    प्रतिनिधी

    मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रार्दूभाव वाढल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने भारतात अलर्ट जारी झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता जगभरात विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात टास्क फोर्स गठीत करणार असल्याची माहिती दिली आहे. Mask again for Sai devotees in Shirdi

    या दृष्टीने आता शिर्डीतल्या साईबाबा संस्थानाने सुद्धा सतर्कतेचे उपाय सुरू केले आहेत. साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी साईबाबा संस्थानने विशेष नियमावली जारी केली आहे.



    साई भक्तांसाठी नियम

    • दर्शनाला आलेल्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा.
    • सोशल डिस्टनसिंगसह सॅनिटायझरचा वापर करावा.
    • ज्यांनी बूस्टर डोस घेतले नसतील त्यांनी त्वरीत घ्यावेत.
    • कोविडचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी.
    • साई संस्थाने प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी हे आवाहन केले आहे. त्यामुळे आता शिर्डीला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे.

    Mask again for Sai devotees in Shirdi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Devendra Fadnavis : ‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांकडून एक-एक रुपया वसूल करणार; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

    Stock Market : शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांची मोठी माघार; कमकुवत रुपया, मंदावलेली वाढ आणि महागड्या शेअर्समुळे भारतावरील विश्वास डळमळला

    पवार + ठाकरे + ममतांच्या डोक्यात भरली होती पंतप्रधान पदाची हवा; पण त्यांना टिचभर प्रादेशिक पक्ष टिकवता येईनात!!