• Download App
    मारुती सुझुकीचा ग्राहकांना झटका, गाड्यांच्या किंमतीत २२, ५०० रुपयांनी वाढ|Maruti Suzuki shocks customers, raises car prices by Rs 22,500

    मारुती सुझुकीचा ग्राहकांना झटका, गाड्यांच्या किंमतीत २२, ५०० रुपयांनी वाढ

    देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारूती सुझुकीनं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने आपल्या काही गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मारूती सुझुकीच्या काही गाड्यांच्या किंमतीत २२ हजार ५०० रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.Maruti Suzuki shocks customers, raises car prices by Rs 22,500


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारूती सुझुकीनं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने आपल्या काही गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मारूती सुझुकीच्या काही गाड्यांच्या किंमतीत २२ हजार ५०० रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

    कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ होत असल्यानं काही मॉडेल्सच्या किंमती वाढवण्यात आल्याचं कंपनीनं शुक्रवारी सांगितलं. कंपनीनं सेलेरियो आणि स्विफ्ट सोडून सर्वच गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत.



    कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार नव्या किंमती शुक्रवारपासूनच तात्काळ प्रभावानं लागू झाल्या आहेत. यानंतर दिल्लीतील शोरूम्समध्ये अनेक गाड्यांच्या किंमतीत १.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

    कंपनी भारतीय बाजारपेठेत आॅल्टोपासून एस क्रॉसपर्यंत अनेक मॉडेल्सची विक्री करते. यापूर्वी कंपनीनं १८ जानेवारी रोजी काही गाड्यांच्या किंमतीत ३४ हजार रूपयांनी वाढ करण्याची घोषणा केली होती.

    Maruti Suzuki shocks customers, raises car prices by Rs 22,500

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!