Maruti Suzuki : रायपूरमध्ये E-20 पेट्रोल टाकल्याने इंजिन खराब; ग्राहक न्यायालय म्हणाले- मारुती सुझुकीने नवी कार किंवा 20 लाख परत द्यावे
देशभरात पेट्रोलमध्ये E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित इंधन) च्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. याच दरम्यान रायपूरमध्ये E20 पेट्रोलमुळे कारचे इंजिन खराब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या संबंधित प्रकरणात ग्राहक न्यायालयाने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि तिच्या अधिकृत डीलरला जबाबदार धरले आहे. न्यायालयाने सांगितले की, नवीन कार द्यावी किंवा 20 लाख रुपये परत करावेत.