महाराष्ट्र केसरी स्पर्धांचे सलग पाच वर्ष आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने सिटी कॉर्पोरेशन बरोबर करार केलेला होते. मात्र, स्पर्धेचा हिशोबा वरून संघटना आणि कुस्तीगीर यांच्यात वाद निर्माण झाला आहे.
प्रतिनिधी
पुणे –सिटी कार्पोरेशन व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत झालेल्या कराराची प्रत मिळावी या मागणीसाठी संदीप भोंडवे यांनी आमरण उपोषनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनाला अर्जुन पुरस्कार काका पवार, रुस्तुम ए हिंद योगेश दोडके, राहुल काळभोर, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच विलास कथुरे यांसह अनेक तालमीचे वस्ताद आणि कुस्तीपटू ही आंदोलनात सहभागी झाले आहेत.Maharashtra Wrestler association wreslter agitation in pune
महाराष्ट्र केसरी स्पर्धांचे सलग पाच वर्ष आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने सिटी कॉर्पोरेशन बरोबर करार केलेला होता. या करारानुसार महाराष्ट्र केसरीचे किताब पटकावणाऱ्यासाठी मोठ्या बक्षिसांची घोषणा कुस्तीगीर परिषदेने केलेल्या होत्या. मात्र, 2019 ला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत किताब मिळालेल्या पैलवानांना पैसे देण्यात आले नाही. तर या स्पर्धेसाठी राज्य शासनाकडून तब्बल 48 लाख रुपयांचा अनुदान कुस्तीगीर परिषदेचे सेक्रेटरी असलेल्या बाळासाहेब लांडगे यांनी घेतला
असून त्याचा कुठलाही हिशोब कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारणी समोर मांडला नसल्यानं अनेक दिग्गज पैलवान हे शुक्रवारी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषणासाठी बसले. यामध्ये दिग्गज पैलवान सहभागी झाले असून हिशोब न दिल्यास आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडे तक्रार देण्यार असल्याचा इशारा उपोषण करणाऱ्या पैलवानांनी दिला आहे. विशेष म्हणजे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दाद मागूनही काहीच न झाल्याने पैलवानांनी उपोषणाच हत्यार उपसले आहे.
याबाबत भोंडवे म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाबाबत 2019 साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व सिटी कार्पोरेशन ( मालक श्री अनिरुद्ध देशपांडे ) यांच्यामध्ये एक करार झाला . वास्तविक महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही एक सार्वजनिक संस्था आहे त्यामुळे या संस्थेमध्ये काहीही करायचे झाले तर कार्यकारणी , वार्षिक सभा यामध्ये याबाबत चर्चा होते. परंतु सिटी कार्पोरेशन सोबत झालेल्या कराराचे ना कार्यकारणीमध्ये वाचन झाले ना वार्षिक सभेची मंजुरी घेण्यात आली व तरीही कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीचा करार मंजुर करुन अंमलामध्ये आणला गेला आहे.
काका पवार म्हणाले, आमचा परिषदेला विरोध नाही मात्र कुस्तीपटू यांचे नुकसान होणे अपेक्षित नाही. या करारामध्ये नक्की काय आहे हे माहीत नसून पैलवानांना किती निधी मिळणार हे सुद्धा स्पष्ट होत नाही. त्यामुळे या कराराची प्रत निळावी ही अपेक्षा आहे.
आंदोलनाला महत्व देत नाही
सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तयारी करायची असून त्यामध्ये अधिक लक्ष दिले आहे. या आंदोलनाला मी अधिक महत्व देत नाही असे बोलून अधिक बोलण्याचे टाळले.