महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगाबाबत चेतावणी दिली आहे. परंतु, स्वतः राज ठाकरेच भाजपाचे अनाधिकृत भोंगा असून त्यांनी जातीयवादी राजकारण केल्यास सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) ने दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगाबाबत चेतावणी दिली आहे. परंतु, स्वतः राज ठाकरेच भाजपाचे अनाधिकृत भोंगा असून त्यांनी जातीयवादी राजकारण केल्यास सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक जाधव, सचिव ताज सिद्दीकी आणि महासचिव अजहर तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत दिला.Maharashtra Navanirman Sena leader Raj Thakare is BJP speaker says social democratic party of india
तांबोळी म्हणाले की, स्वतःचे संपुष्टात आलेले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अशा प्रकारचे राजकारण राज ठाकरे करीत आहेत. मशिदीवरील भोंगे फक्त 15 टक्के असून बाकीचे 85 टक्के हे विविध मंदिरावर आहेत. राज ठाकरे खरंच या सामाजिक प्रश्नांवर गंभीर असतील तर त्यांनी सर्वात प्रथम इतर भोंगे काढावेत.
मनसेच्या या जातीय सलोखा बिघडवणार्या घाणेरड्या जातीयवादी राजकारचे सडेतोड प्रतिउत्तर देण्यात येईल. तसेच राज्यातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये पक्षाच्या वतीने राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्याचबरोबर दि. 1 मे रोजी औरंगाबाद येथे होणार्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारावी, असे पत्रही तेथील पोलिस आयुक्तांना देणार असून त्यांच्या सभेमध्ये काळे झेंडे दाखवुन निषेध नोंदविणार असल्याचे ही जाधव यांनी यावेळी सांगितले.