• Download App
    Maharashtra Budget 2022 : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे महाराष्ट्रातले काम अर्धवट; पण बजेटमध्ये मुंबई - हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव!!|Maharashtra Budget 2022: Mumbai-Ahmedabad bullet train work in Maharashtra incomplete; But Mumbai-Hyderabad bullet train is proposed in the budget

    Maharashtra Budget 2022 : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे महाराष्ट्रातले काम अर्धवट; पण बजेटमध्ये मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या 2022 – 23 च्या अर्थसंकल्पात वाहतूकीच्या पायाभूत सुविधेला अतिशय महत्त्व देण्यात आले असून अर्थमंत्री अजित पवार यांनी मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगत तो प्रस्ताव ठेवला आहे. Maharashtra Budget 2022: Mumbai-Ahmedabad bullet train work in Maharashtra incomplete; But Mumbai-Hyderabad bullet train is proposed in the budget

    मात्र, एकीकडे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे फक्त 20 % काम महाराष्ट्रात आहे. 80 % काम गुजरात मध्ये आहे. यातले महाराष्ट्राच्या वाट्याचे 20 % काम हे देखील अजून अर्धवटच आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारकडे मुंबई ‘ हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव ठेवला आहे. बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी वाहतूक या पायाभूत सुविधांसाठी महाराष्ट्रासाठी विविध तरतुदी देखील केल्या आहेत.



    मुंबई आणि हैदराबाद ही दोन्ही मोठी व्यापारी शहरे जोडण्यासाठी दोन्ही शहरांदरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल

    मुंबई-पुणे समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया गडचिरोलीपर्यंत करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

    गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारणार असल्याची महत्त्वाची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी केली.

    मुंबई शिवडी- न्हावा शेवा सागरी सेतू 2023 च्या अखेरीस सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा अजित पवार यांनी केली.

    एसटी महामंडळाला एक हजार नवीन बसेस देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील रेल्वे, रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतूक विकसित करणार

    वसई, भाईंदर, डोंबिवली, कल्याण, वाशी, ऐरोली, बेलापूर ही ठिकाणे जलमार्गाशी जोडणार; या ठिकाणच्या जेट्टींच्या विकासासाठी, खाडीची खोली वाढवण्यासाठीच्या कामासाठी 330 कोटींचा खर्च अपेक्षित आहे

    शिर्डी विमानतळाला 150 कोटींच्या निधीची तरतूद, तर रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटींच्या निधीची तरतूद

    मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरवठा करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले.

    पर्यावरण पूरक 3 हजार बस सुरू करणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

    राज्यात ई-वाहनांसाठी 5000 ई-चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यात इलेक्ट्रीक वाहनांचा भविष्यातील वाढणारा वापर पाहता हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे

    मुंबई महानगर क्षेत्राला जलमार्गाने जोडण्याचा उद्देश असल्याचे अजित पवार यांनी सांगितले

    परिवहन विभागाला 3 हजार 303 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

    पुणे रिंग रोडसाठी  १५०० कोटींचा निधी प्रस्तावित

    Maharashtra Budget 2022: Mumbai-Ahmedabad bullet train work in Maharashtra incomplete; But Mumbai-Hyderabad bullet train is proposed in the budget

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस