वृत्तसंस्था
मुंबई : अमृता फडणवीस यांनी ‘शिवतांडव स्तोत्र’ गायले आहे. ‘शिवतांडव स्तोत्र’ रिलीज होताच काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अमृता पत्नी आहेत. कधी वक्तव्य अथवा मतप्रदर्शनाच्या निमित्ताने तर कधी त्यांनी गायलेल्या गाण्यांमुळे त्या चर्चेत असतात. Maha Shivratri Special, Amruta Fadnavis Shiv Tandav Stotram
आता पण अमृता फडणवीस त्यांनी गायलेल्या शिव तांडव (शिवतांडव) स्त्रोत्रामुळे चर्चेत आल्या आहेत. या स्त्रोत्राचा व्हिडीओ यूट्युबवर प्रदर्शित झाला आहे. हा व्हिडीओ प्रदर्शित झाल्यावर काही तासांतच त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. दिग्दर्शक रवी जाधव यांनी हा व्हिडीओ दिग्दर्शित केला आहे. शैलेश दानी या व्हिडीओचे संगीत दिग्दर्शक आहेत.
याआधी अमृता फडणवीस यांनी गणेशोत्सवात एक गाणे प्रदर्शित केले होते. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यातील नद्यांवरही एक गाणे केले होते. ‘तिला जगू द्या’ हे मुलींच्या संदर्भातले त्यांचे गाणेही आधी लोकप्रिय झाले होते.
Maha Shivratri Special, Amruta Fadnavis Shiv Tandav Stotram
महत्त्वाच्या बातम्या
- युक्रेनने केली एक चूक, अन्यथा रशियाला आक्रमण करण्याचे धाडसही झाले नसते
- अटलबिहारी वाजपेयींचे उदाहरण देत शशी थरुर यांचा इम्रान खान यांना सल्ला, थोडा जरी आत्मसन्मान
- माजी सैनिकांना मोदी सरकारची भेट, चार लाखांहून अधिक सेवा केंद्रांवर मिळू शकणार पेन्शन
- शेतीला आधुनिक करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतुदी, पंतप्रधानांची माहिती