• Download App
    NASHIK START UP : नाशिकच्‍या स्‍टार्टअपचा आविष्कार; थ्री इडियट्सनी साकारली बहुउपयोगी 'RM मित्रा'|Kashi Vishwanath Corridor inaugurated; Congress attacks Modi by playing "Hindu or pro-Hindu" word game !!

    NASHIK START UP : नाशिकच्‍या स्‍टार्टअपचा आविष्कार; थ्री इडियट्सनी साकारली बहुउपयोगी ‘RM मित्रा’

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : मोदींच्या स्टार्ट अप इंडियामध्ये अनेक तरूण नवनवीन अविष्कार करत आहेत. त्यातच सध्या इलेक्‍ट्रिक वाहनांचा जमाना आहे.त्यातही अनेक प्रयोग होत आहेत. हे वाहन केवळ दळण-वळणापुरते मर्यादित न ठेवता वापरकर्त्यांना त्‍यांच्‍या गरज व आवश्‍यकतेनुसार वेग वेगळ्या उपयोगात आणता येईल, असे वाहन नाशिकच्या थ्री इडियट्सनी तयार केले आहे.Kashi Vishwanath Corridor inaugurated; Congress attacks Modi by playing “Hindu or pro-Hindu” word game !!

    नाशिकचे स्‍टार्टअप असलेल्‍या ‘रिवॅम्‍प मोटो’ (Revamp Moto) यांनी ही बहुउपयोगी ‘आरएम मित्रा’ (RM Mitra) दुचाकी साकारली आहे. जयेश टोपे, प्रितेश महाजन आणि पुष्कराज साळुंके यांच्‍या या स्‍टार्टअपला गुंतवणूकदारांचा, तर वाहनाला ग्राहकांचा आत्तापासून प्रतिसाद मिळतो आहे.



    विशेष म्‍हणजे सोनी वाहिनीवरील शार्क टँक या स्‍टार्टअपविषयक कार्यक्रमासाठी या स्‍टार्टअपची निवड झाली असून, ते राष्ट्रीय स्‍तरावर झळकणार आहे.

    शासनाचे अनुदान

    जयेश, प्रितेश आणि पुष्कराज हे तिघेतही नाशिकचे भुमिपूत्र असून, त्‍यांनी मेकॅनिकल शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.टीसीएसच्‍या (TCS) डिजिटल इम्‍पॅक्‍ट स्‍क्‍वेअरमधील मार्गदर्शक निखील देवरे यांच्‍यामुळे तिघे एकत्र आले.

    पहिल्‍याच भेटीत स्‍टार्टअप निर्मितीचा निर्धार तिघांनी केला. सप्‍टेंबर २०२० मध्ये ही भेट झाली होती. त्यानंतर अवघ्या वर्षभरात स्‍टार्टअपचा विस्‍तार करून तिघांनी मोठे यश मिळविले आहे.

    हाय स्‍पिड ‘आरएम मित्रा’च्‍या तंत्रज्ञानासाठी पेटंट, तसेच ट्रेडमार्कची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. शासनाचे अनुदान मिळत असल्‍याने हे वाहन ४५ ते ६० हजार रुपयांपर्यंत उपलब्‍ध होऊ शकते.

    जयेश, प्रितेश आणि पुष्कराज यांनी सुरवातीला वैयक्‍तिक स्‍टार्टअप उभारलेले आहेत. जयेशने व्‍हेजिटोफार्म हे स्‍टार्टअप कोरोना काळात सुरु केले. शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोचवितांना उलाढाल वीस ते पंचवीस लाखांपर्यंत नेली.

    परंतु, इलेक्‍ट्रीक व्‍हिकलविषयीच्या प्रेमापोटी तो पुन्‍हा आपल्‍या स्‍वप्‍नाकडे वळला. पुष्कराजनेदेखील इलेक्‍ट्रॉनिक्‍स सर्कीट, इलेक्‍ट्रॉनिक्‍स सोल्‍यूशन्सशी निगडीत स्‍टार्टअप चालविले आहे. तर प्रितेशने एसबीआयमध्ये नोकरी करताना अर्धवेळ विविध संकल्‍पनांवर काम करण्यासाठी स्‍टार्टअप सुरु केले.या तिघांनी आपल्‍या पहिल्‍या टप्‍यातील या अनुभव व चुकांतून शिकत आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा केल्‍या.

    वाह टीम वर्क

    अगदी शिक्षणासाठी युकेला जाण्याच्‍या तयारीत असलेल्‍या प्रितेशने ऐनवेळी निर्णय बदलत स्‍टार्टअपमध्ये सहभाग नोंदविला. स्‍टार्टअपला बळकटी देण्यासाठी चांगल्‍या टीमची आवश्‍यकता होती. अशात यापूर्वी महाविद्यालयीन स्‍तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या आपल्‍याच काही साथीदारांना विचारणा केली.

    अंतीम वर्षात असलेल्‍या या आठ जणांना तसे नामांकित कंपन्‍यांत चांगल्‍या पॅकेजच्‍या संधी उपलब्‍ध होत्या. परंतु, त्‍या धुडकावत रिवॅम्‍प मोटोची टीम अधिक बळकट झाली. आता हे आठही संस्‍थापक सदस्‍य झालेले आहेत.

    अशी आहे ‘आरएम मित्रा’ची संकल्‍पना

    केवळ दळणवळणासाठी इलेक्‍ट्रॉनिक वाहनाचा मर्यादित वापर न ठेवता समाजातील प्रत्‍येक घटकाला त्‍यांच्‍या गरजेनुसार वापरता येईल अशी वाहनाची रचना केलेली आहे.

    शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूकीपासून तर एखाद्या छोट्या व्‍यावसायिकाला ‘शॉप ऑन टु व्‍हिल’, व्‍यवसायातील माल वाहतूक, दिव्‍यांगांना सुलभ प्रवासापासून तर तरुणाईला स्‍पोर्ट लूकचे वाहन असे बहुउपयोगी वापर या वाहनाचे आहेत. विशेष म्‍हणजे आपल्‍या गरजेनुसार या वाहनाची रचना घरच्‍या घरीच करता येते. कॉर्पोरेटलाही त्‍यांच्‍या उपयोगासाठी व वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे विशेष सॉफ्टवेअर उपलब्‍ध करुन दिले जाते आहे.

    ”आधीपासून इलेक्‍ट्रॉनिक व्‍हिकल निर्मितीची आवड होती. एकाच धेय्याने झपाटलेले आम्‍ही एकत्र आलो व आमची चांगली टीम तयार झाली. बहुउपयोगी अशी आरएम मित्रा ही प्रत्‍येक समाज घटकासाठी उपयुक्‍त ठरेल. आम्‍हाला गुंतवणूकदार तसेच, ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.”

    Kashi Vishwanath Corridor inaugurated; Congress attacks Modi by playing “Hindu or pro-Hindu” word game !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!