प्रतिनिधी
औरंगाबाद : जायकवाडी धरणात गुरुवारी सकाळी अकरा वाजता ५३ टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या पाच दिवसापासून नाशिकमधून झालेल्या विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत होती. मात्र आता नांदुरमधमेश्वर मधून विसर्ग देखील कमी झाला आहे. तसेच जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक देखील कमी झाला आहे. गेल्या २४ तासात जायकवाडीत साडेसात टीएमसी पाण्याची आवक झाली झाली आहे.Jayakwadi dam is 53 percent full, 7.5 TMC of water arrives in 24 hours
जायकवाडीत बुधवारी एक लाख क्युसेकने विसर्ग सुरु होता.
दुपारी दोन नंतर 90 हजार क्युसेक आवक सुरु झाली होती. त्यानंतर. रात्री आठ वाजता ही आवक एक लाख पाच हजार क्युसेक इतकी झाली होती. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
- संभाजीनगरचा पाणीप्रश्न : भाजप ते राज्यपाल चौफेर कोंडीनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांना घालावे लागले लक्ष!!
जाययकवाडीत २४ तासात दहा टक्के वाढला पाणीसाठा
जायकवाडीत गेल्या २४ तासात दहा टक्के पाणीसाठा वाढला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता जायकवाडीत ४३ टक्के पाणीसाठा होता. यामध्ये उपयुक्त पाणीसाठा ९३९ दलघमी इतका होता. तर गुरुवारी सकाळी आठ वाजता हा पाणीसाठा
११४४ दलघमी इतका झाला आहे. हे प्रमाण ५२.७४ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात जायकवाडीत २०५ दलघमी पाण्याची आवक झाली आहे.
गंगापूरमधून ८८८० क्युसेक विसर्ग
नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अजूनही विसर्ग सुरु आहे. सध्या गंगापूर प्रकल्पातून ८८८० क्युसेक विसर्ग सुरु आहे. तर दारणा प्रकल्पातून ८८४६ क्युसेक विसर्ग सुरु आहे. तर कडवा २५९२ होळकर ब्रीज १०८५४ क्युसेक विसर्ग सुरु आहे. तर नांदुरमधमेश्वर प्रकल्पातून ४०५२१ क्युसेक विसर्ग सुरु आहे. तर जायकवाडीत सध्या ३५५५५ क्युसेक आवक सुरु आहे. एक लाख क्युसेक ही आवक काल सुरु होती.त्यामुळे पाण्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत होती.मात्र आता ही आवक कमी झाली असुन यामध्ये आणखी घट होणार आहे.
Jayakwadi dam is 53 percent full, 7.5 TMC of water arrives in 24 hours
महत्वाच्या बातम्या
- विरोधकांची राजकीय (कु)बुद्धी : आधी संसदेवरचे सिंह दिसले “हिंस्र”; आता असंसदीय शब्दांसाठी “आग्रह”!!
- पेट्रोल – डिझेल स्वस्त, शुक्रवारपासून प्रमुख शहरांमध्ये असे असतील नवे दर!!
- PFIचा खतरनाक कट : ‘2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची योजना’; बिहारमधून दोन संशयितांना अटक
- कॅनडात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना : भारतीय दूतावासाकडून कठोर कारवाईची मागणी