• Download App
    शरद पवारांच्या हस्तेच झाला होता दिवंगत पुरंदरेंचा डी.लिट देऊन सन्मान, आता म्हणाले- पुरंदरे यांच्या भाषण, लिखाणातून शिवाजी महाराजांवर अन्याय झाला|It was at the hands of Sharad Pawar that the late Purandare was honored by giving D.Litt, now he said- Purandare's speech and writing caused injustice to Shivaji Maharaj

    शरद पवारांच्या हस्तेच झाला होता दिवंगत पुरंदरेंचा डी.लिट देऊन सन्मान, आता म्हणाले- पुरंदरे यांच्या भाषण, लिखाणातून शिवाजी महाराजांवर अन्याय झाला

    प्रतिनिधी

    पुणे : दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे, लिखाण, पुस्तके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला. मला त्यांचे लिखाण कधीच पटले नाही. महाराजांच्या कार्यात रामदासाचे योगदान काय? दादोजी कोंडदेवचे योगदान काय? अशा अनेक जणांचे संबंध जाणीवपूर्वक जोडले गेले. दादोजी कोंडदेव व शिवाजी महाराजांचा कोणताही संबंध नव्हता. राजेंना दिशा देण्याचे काम जिजाऊ माता यांनी केले. त्यांच्या गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.It was at the hands of Sharad Pawar that the late Purandare was honored by giving D.Litt, now he said- Purandare’s speech and writing caused injustice to Shivaji Maharaj

    शरद पवार म्हणाले की, कोल्हापूरचे दिवगंत कॉ. गोविंद पानसरे यांनी जे पुस्तकाचे लिखाण केले त्यातून छत्रपतींच्या काळातील वास्तव समोर आले, ते विसरता येणार नाही. सत्यावर आधारित नवा इतिहास नव्या पिढीला आपणास द्यावयाचा असून पाखंडी इतिहास नको, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी मांडली.



    या वेळी छत्रपती शाहू महाराज, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. पी. डी. जगताप, डॉ. श्रद्धा कुंभोजकर, चंद्रशेखर शिखरे, राजकुमार घोगरे, श्रीमंत कोकाटे उपस्थित होते.

    दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यावरून आता टीका सुरू झाली आहे. कारण पुरंदरे हयात असताना स्वतः पवारांच्या हस्ते त्यांना डी. लिट ही पदवी देऊन सन्मानित केलं होतं. जर बाबासाहेब पुरंदरेंच्या साहित्यातून शिव छत्रपतींची बदनामी झाली हे पवारांना माहिती होतं तर पवार पुरंदरेंचा सन्मान का केला? त्यांनी कार्यक्रमाला न जाता निषेध व्यक्त करायला हवा होता, असा सूर सोशल मीडियावर उमटू लागला आहे.

    It was at the hands of Sharad Pawar that the late Purandare was honored by giving D.Litt, now he said- Purandare’s speech and writing caused injustice to Shivaji Maharaj

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा