• Download App
    IT Raids : महाराष्ट्रात 40 ठिकाणी इन्कम टॅक्सचे छापासत्र; अजित पवारांच्या तीन बहिणींचा कंपन्यांवरही छापे। IT Raids: Income tax press releases at 40 places in Maharashtra; Ajit Pawar's three sisters also raided companies

    IT Raids : महाराष्ट्रात 40 ठिकाणी इन्कम टॅक्सचे छापासत्र; अजित पवारांच्या तीन बहिणींचा कंपन्यांवरही छापे

    प्रतिनिधी

    मुंबई : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे महाराष्ट्र आणि कर्नाटकात बंगलोर मध्ये जोरदार छापासत्र सुरू झाले असून एकूण 40 ठिकाणी हे छापासत्र सुरू असल्याची माहिती आहे. यामध्ये सुरुवातीला शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निकटवर्तीयांवर छापे घातल्याची बातमी आली, पण आता त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरांवर देखील इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातल्याची बातमी आली आहे. आयबीएन लोकमतने ही बातमी दिली आहे. IT Raids: Income tax press releases at 40 places in Maharashtra; Ajit Pawar’s three sisters also raided companies

    याचा अर्थ इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कायदेशीर कारवाईचा संपूर्ण महाराष्ट्रभर वरवंटा फिरत असून अनेक बडे नेते आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या जाळ्यात आल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे. या छाप्यांमध्ये नेमके काय सापडले, त्याचे तपशील अद्याप जाहीर झाले नसले तरी त्याविषयी महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशात आता मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.

    इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आज सकाळीच शिवसेनेच्या नेत्यांना जाळ्यात ओढले असून आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती राहुल कनाल यांच्या घरांवर छापे सुरू असतानाच परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्ती संजय कदम यांच्या घरावर इन्कम टॅक्स छापे पडल्याची बातमी आली आहे

    “हे” तर दिल्लीचे महाराष्ट्रावरचे आक्रमण आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी राहुल कलाल यांच्या घरावरील छाप्यांवर व्यक्त केली आहे. मात्र, ही प्रतिक्रिया येते न येते तोच अनिल परब यांचे निकटवर्ती आणि अंधेरी पश्चिम मतदार संघ विभागाचे शिवसेना संघटक संजय मानाजी कदम यांच्या घरावर इन्कम टॅक्स छापे पडल्याची बातमी आली आहे.



     यशवंत जाधव ते संजय कदम

    शिवसेनेच्या नेत्यांवरचे छापासत्र मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरांवरील छाप्यांपासून सुरू झाले आहे. त्यांच्या घरांवर तसेच त्यांच्याशी संबंधित कंत्राटदार यांच्या 35 ठिकाणांवर असेच काही दिवसांपूर्वी छापे घातले होते. त्यानंतर हे छापा सत्र आज पुन्हा सुरू झाले आहे.

    यातले पहिले छापे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती, शिर्डी संस्थानचे विश्वस्त आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कलाल यांच्या मुंबई आणि पुण्याच्या घरांवर पडले आहेत आणि त्यानंतर अनिल परब यांच्या निकटवर्ती संजय मानाजी कदम यांच्या घरावर छापे पडल्याची बातमी आली आहे.

    त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील बहिणीच्या घरांवर दिसेल छापे घातले ची बातमी आली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकात 40 ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने हे छापे एकाच वेळी सुरू केले आहेत.

    संजय राऊत यांची दुपारी पत्रकार परिषद

    शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे आज दुपारी 4.00 वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. संजय राऊत यांनी पंतप्रधान कार्यालयाला 13 पानी पत्र लिहिले आहे. यामध्ये केंद्रीय तपास संस्थांच्या अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे पत्र त्याच पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर ठेवणार आहेत.

    IT Raids: Income tax press releases at 40 places in Maharashtra; Ajit Pawar’s three sisters also raided companies

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!