विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : तळकोकणात दरवर्षी अनेक परदेशी पक्षी थंडीच्या दिवसात दाखल होतात. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच सागरकिनारे परदेशी पाहुण्यांनी फुलले आहेत. In Sindhudurg district Seagull’s flies
सीगल नावाचे हे पक्षी अमेरिका, युरोप, लडाखमध्ये पहायला मिळतात. हजारो किलोमीटरची भरारी मारून हे पक्षी तीन महिने थंडीच्या हंगामात कोकण किनारपट्टीवर येतात. उबदार वातावरण आणि खाद्य असलेले मासे या हंगामात कोकण किनाऱ्यावर मुबलक प्रमाणात मिळत असते. त्यामुळेच हे पक्षी कोकण किनारपट्टीचा आसरा घेतात.
कोकणचे किनारे सुंदर, स्वच्छ आहेत. त्यातच सीगल पक्ष्यामुळे त्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात.पण यावर्षी बदलत्या हवामानामुळे हे पक्षी उशीरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर दाखल झालेले पहायला मिळतात.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सीगलच्या समुद्रात भराऱ्या
- सीगल पक्ष्यामुळे किनारपट्टीचे सौंदर्य खुलले
- परदेशी पाहुण्यांनी समुद्र किनारे फुलले
- सीगल पक्षी अमेरिका, युरोप, लडाखमध्ये दिसतात
- हजारो किलोमीटरचा प्रवास करून कोकणात दाखल
- बदलत्या हवामानामुळे हे पक्षी यंदा उशीरा दाखल
In Sindhudurg district Seagull’s flies
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील संसर्ग दर चिंताजनक : राजेश टोपे; भीती बाळगू नका, काळजी घेण्याचे आवाहन
- भायखळ्यात गोडाऊनला लागली भीषण आग , तब्बल ४ तास आग विझवण्यासाठी झुंज
- घसा खवखवला तर समजावे, हे ओमीक्रॉनचे प्रमुख लक्षण ; तज्ञांचा खुलासा; लस घेतलेल्यांनाही संसर्ग
- भोसरी एमआयडीसी प्रकरण, मंदा खडसे यांना १७ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश