सोशल मीडियावरून विराट कोहलीच्या मुलीवर बलात्काराचा धमकी देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीला बेड्या ठोकल्या.IIT ENGINEER ARRESTED: Mumbai police arrest engineer who threatened to rape Virat Kohli’s daughter
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आयसीसी टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली. पारिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर सोशल मीडियावरून विराट कोहलीच्या मुलीवर बलात्काराचा धमकी देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीला बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामनागेश अलिबथिनी आहे. तो इंजिनियर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विराटच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणाऱ्या आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी हा इंजिनियर असल्याचे समोर आले आहे. तसेच तो फूड डिलिव्हरी अॅपसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.
पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर
सोशल मीडियावरील ट्रोलर्सनी विराट कोहलीला लक्ष्य केले होते. तसेच त्यात एकाने थेट विराट कोहलीच्या अवघ्या दहा महिन्यांच्या लेकीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. ही बाब समोर आल्यावर त्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. तसेच संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानुसार अखेर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपीला बेड्या ठोकल्या.
IIT ENGINEER ARRESTED: Mumbai police arrest engineer who threatened to rape Virat Kohli’s daughter
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल