• Download App
    ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले त्यांनाच उमेदवारी कशी, राजू शेट्टी यांचा पंढरपुरात महाविकास आघाडीविरुध्द एल्गार|How to nominate only those who have exhausted the money of farmers, Raju Shetty's asked Mahavikas Aghadi in Pandharpur

    ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले त्यांनाच उमेदवारी कशी, राजू शेट्टी यांचा पंढरपुरात महाविकास आघाडीविरुध्द एल्गार

    ज्या साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले त्यांनाच उमेदवारी कशी?’ असा सवाही करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीविरुध्द एल्गार पुकारला आहे.How to nominate only those who have exhausted the money of farmers, Raju Shetty’s asked Mahavikas Aghadi in Pandharpur


    विशेष प्रतिनिधी 

    पंढरपूर : ज्या साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले त्यांनाच उमेदवारी कशी?’ असा सवाही करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीविरुध्द एल्गार पुकारला आहे.

    शेतकरी प्रश्नांवर महाविकास आघाडीचे सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप राजू शेट्टी सातत्याने करत आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडीचा भाग असूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादी च्या उमेदवाराविरुध्द उमेदवार उभा केला आहे.



    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आपले उमेदवार सचिन शिंदे यांचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. ते मतदारसंघात तळ ठोकून बसले आहेत.

    शेट्टी म्हणाले, सरकारनं याकडे दुर्लक्ष केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारच्या अपयशावर बोट ठेवेल. कोरोनाच्या काळात विकासकामांवरील निधी कमी केला. परंतु, त्या निधीतून आरोग्य सुविधा उभारल्या नाहीत. यांना भ्रष्टाचार करण्यासाठी निधी कमी करू दिला नव्हता.

    महाविकास आघाडी सरकारनं शेतक-यांच्या एफआरपीचा प्रश्न मार्गी लावावा आणि 100 युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ करावे अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे.

    How to nominate only those who have exhausted the money of farmers, Raju Shetty’s asked Mahavikas Aghadi in Pandharpur

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!