विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीला महापूर आला आहे.गोदावरीच्या नदीपात्रातील पाणी नाशिक शहरातील बाजारपेठेत शिरले आहे. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे गंगापूर धरणातून सोडलेले पाणी यामुळे गोदामाय दुथडी भरून वाहत आहे.Godavari river overflow due to Heavy Rains in Area; water Rushed in Nashik town
धरणातून १५ हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. गोदाकाठावरील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
- नाशिकच्या गोदावरी नदीला आला महापूर
- शहरातील बाजार पेठेत शिरले पाणी
- गगापूर धरणातून १५ हजार क्यूसेकने विसर्ग
- गोदाकाठावरील सर्व मंदिरे पाण्याखाली
- गोदावरी नदीने धारण केले रौद्ररूप