• Download App
    |परभणीत पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे हाल, एकरी 50 हजार मदतीची मागणीFlood water in Parbhani, farmers demand Rs 50,000 per acre

    परभणीत पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे हाल, एकरी 50 हजार मदतीची मागणी दुधनाकाठच्या मुरुंबा गावाला पुराचा फटका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांत हाहाकार उडाला आहे. मागच्या 48 तासांत 37 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नदीकाठच्या गावांना खासकरून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील दुधना नदीकाठच्या मुरुंबा गावालाही पुराचा फटका बसला आहे.Flood water in Parbhani, farmers demand Rs 50,000 per acre

    गावात पुराचे पाणी शिरले आहे. गावातील जि.प. शाळेपर्यंत हे पाणी आले आहे. याशिवाय दुधना नदीकाठच्या शेतांमध्येही पाणीच पाणी झाले आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनला जलसमाधी मिळाली आहे. गावातील शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. शासनाने तातडीने पाहणी करून एकरी कमीत कमी 50 हजार रुपयांपर्यंतची मदत जारी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.



    • दुधनाकाठच्या मुरुंबा गावात शिरले पुराचे पाणी
    • आजूबाजूच्या गावांतही भीषण पूरस्थिती
    • काढणीला आलेले पीक पुराच्या पाण्यात
    • सोयाबीनसह इतर पिकांचे अतोनात नुकसान
    • अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
    • शासनाने तातडीने आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी
    • अतिवृष्टीचा मराठवाड्याला मोठा फटका
    • एकरी 50 हजार मदतीची शेतकऱ्यांची मागणी
    • अतिवृष्टीमुळे गावातील काही घरांचीही पडझड
    • तातडीने पंचनामे करून मदत जारी करण्याचे आवाहन

    Flood water in Parbhani, farmers demand Rs 50,000 per acre

    Related posts

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!