Parbhani : दहशतवादी कारवायांच्या संशयावरून परभणीत एटीएसचे 15 ठिकाणी छापे; 12 जण ताब्यात, पथकात संभाजीनगर व नांदेड एटीएसही
ऑनलाइन माध्यमातून होत असलेल्या दहशतवादी कारवाया आणि संशयास्पद हालचालींच्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी पहाटे परभणी शहरात मोठी कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील एटीएसच्या पथकाने पहाटे तीन वाजता शहरातील १५ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागाच्या संशयावरून १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.