उजनीचे पाणी चांगलेच पेटले असून सोलापूर येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आंदोलनाची भीती असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माळेगाव (ता. बारामती ) येथील गोविंदबाग या निवास स्थानावरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.Fear of agitation from Solapur farmers, increase in security at Shard Pawars Baramati residence
विशेष प्रतिनिधी
बारामती : उजनीचे पाणी चांगलेच पेटले असून सोलापूर येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आंदोलनाची भीती असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माळेगाव (ता. बारामती ) येथील गोविंदबाग या निवास स्थानावरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
बुधवारी सकाळ पासूनच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.उजनीचे 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय नुकताच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द ठरवला आहे.
त्यानंतर उजनीचे पाणी चांगलेच पेटले आहे. इंदापूर तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. येथील राष्ट्रवादीच्या स्थनिक कार्यकर्त्यासह शेतकरी आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे इंदापूर आणि सोलापूर चा वाद धुमसतच आहे. या पार्शवभूमीवर मोहोळ तालुक्यातील शेतकरी गोविंद बागे समोर आंदोलनासाठी येणार असल्याने हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान आंदोलनासाठी आलेले मोहोळ येथील दोन शेतकऱ्यांना पोलिसांनी माळेगाव येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणखी किती आंदोलक येणार आहेत, तसेच आंदोलन केव्हा आणि कधी होणार, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
Fear of agitation from Solapur farmers, increase in security at Shard Pawars Baramati residence
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींचे वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये बीजभाषण, जगभरातील बौद्ध संघ प्रमुखांशी व्हर्च्युअली संवाद
- 7 Years Of Modi Government : पीएम मोदींच्या ७ वर्षांच्या सत्तेतील देशात आमूलाग्र बदल करणारे ७ महत्त्वाचे निर्णय
- Coronavirus Cases in India : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ, २४ तासांत २.०८ लाख रुग्णांची नोंद, ४१५७ मृत्यू
- Whatsapp ने भारत सरकारविरुद्ध दाखल केला खटला, नव्या IT नियमांमुळे प्रायव्हसी संपण्याचा दावा
- राष्ट्रीय लोक दलाच्या अध्यक्षपदी उच्चविद्याविभूषित जयंत चौधरी यांची निवड, तिसऱ्या पिढीकडे नेतृत्व