विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी रेमेडिसिवीरच्या तुटवड्याबाबत बोलताना केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले.महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. Face-to-face: Nawab Malik made baseless allegations, while Atul Bhatkhalkar fired a cannon;
मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली मात्र त्यांच्या ह्या आरोपानंतर भाजपच्या प्रविण दरेकर, अतुल भातखळकर तसेच केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले.
”महाराष्ट्राला रेमडेसिवीर पुरविले तर कंपन्यांवर कारवाई करू, अशी केंद्र सरकारने कंपन्यांना धमकी दिली हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे बेशरमपणा आणि खोटारडेपणाचा कळस आहे, नवाब मलिकांनी आपल्या या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी,” अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
”राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेडचा तुटवडा आहे, असे मलिक म्हणतात, मग यांचे मंत्री कुठे आहेत, हे बिळात लपून बसले आहेत का. टि्वटरवरुन असे खोटे व बेशरमपणाचे आरोप मलिक करीत आहेत.
त्यांनी पुरावे द्यावेत. जनतेची माफी मागा..अन्यथा राजीनामा द्या,” असे भातखळकर यांनी म्हटलं आहे. विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनीही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Face-to-face: Nawab Malik made baseless allegations, while Atul Bhatkhalkar fired a cannon