• Download App
    मुंबई मेली तरी चालेल, आपली घरे भरायची; देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत शिवसेनेवर हल्लाबोल!!|Even if Mumbai dies, it will work, fill your houses; Devendra Fadnavis attacks Shiv Sena in Assembly

    मुंबई मेली तरी चालेल, आपली घरे भरायची; देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत शिवसेनेवर हल्लाबोल!!

    प्रतिनिधी

    मुंबई : कोरोना काळात कोविड सेंटरचे काम कुणाकुणाला दिली गेली, याचे धक्कादायक खुलासे करत कोविड केअर सेंटरला चांगली नावे देऊन किंवा प्रतिष्ठित कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली नावे देऊन काम देण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला.Even if Mumbai dies, it will work, fill your houses; Devendra Fadnavis attacks Shiv Sena in Assembly

    मुंबई मेली तरी चालेल पण आपली घरे भरली पाहिजेत ही त्यांची मनोवृत्ती आहे, अशा कठोर शब्दांमध्ये फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. इतकेच काय तर 5 कोविड सेंटरच्या 100 कोटींची कंत्राटे ही पदाधिकाऱ्यांच्याच नातेवाईकांना देण्यात आल्याचा पर्दाफाश फडणीसांनी केला.



    पुण्यातून हाकलले त्यालाच मुंबईत कंत्राटे

    अनुभव नसलेल्या लोकांना काम द्यायचे. त्या ठिकाणी रुग्ण आला की नाही, त्याला 50 टक्के रक्कम दिली गेली. कारण आपल्याच कुणाला तरी कोविड सेंटर देण्यात आली होती. अजित पवार यांनी पुण्यातून ज्या कोविड सेंटरच्या कंत्राटदाराला 15 दिवसांत हाकलले. त्यांनाच मुंबईत 5 कोविड सेंटरचे कंत्राट देण्यात आले. पण त्यावर कुठली कारवाई होताना दिसत नाही, असेही फडणवीस म्हणाले. मुंबईतीतल मुलुंड कोविड सेंटरचे काम घाईघडबडीत देण्यात आल्याचेही फडणवीसांनी म्हटले आहे.

    आपल्याच एकाच्या आशा कॅन्सर ट्रस्टला ही कामे देण्यात आल्याचेही फडणवीसांनी यावेळी नमूद केले आहे. या सगळ्यांची कुठे नोंदच नसल्याचाही सनसनाटी आरोपही फडणवीसांनी केला आहे. महिन्याभरातच त्यांची पोलखोल झाली आणि महिन्यात त्यांचे कंत्राट रद्द झाले, असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

    मुंबईचा शत्रू कोण आहे, हे लक्षात आले

    कोविड कंत्राट देण्यावरुन झालेल्या घोटाळ्यावरुन त्यांना शिवसेनेवर थेट निशाणा साधला. मुंबई मेली तरी चालेल, पण आपली घर भरणे मात्र जोरात सुरु आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. ‘आम्ही बोललो, तर आम्ही मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणसाचे शत्रू’, असे हिणवले जाते.

    आता मात्र प्रत्येकाला मुंबईचा शत्रू कोण आहे, हे लक्षात आले आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीकेची तोफ डागली आहे. कोण प्रेताच्या टाळूवरचे लोणी खात आहे? हे आता सगळ्यांना कळले आहे, असेही फडणवीस म्हणाले.

    Even if Mumbai dies, it will work, fill your houses; Devendra Fadnavis attacks Shiv Sena in Assembly

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!