• Download App
    जुलैमधील धुवांधार पावसामुळे मुंबईच्या तलावात ८० टक्के पाणीसाठा। Enough water in Mumbai lakes

    जुलैमधील धुवांधार पावसामुळे मुंबईच्या तलावात ८० टक्के पाणीसाठा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत पावसाने महामुंबई परिसरात ओढ दिली होती; मात्र त्यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सुमारे ८० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मुंबईला आता दोन लाख ९० हजार दक्षलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत हा पाणीसाठा जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Enough water in Mumbai lakes



    ऑगस्टच्या मध्यानंतर आणि सप्टेंबरमध्ये कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा धरणात आवश्ययक पाणीसाठा जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

    मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. सध्या तलावात ११ लाख ५७ हजार १६१ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी दोन लाख ९० हजार १६१ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे.

    Enough water in Mumbai lakes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; कृत्रिम वाळू एम-सँड धोरणास मंजुरी, प्रतिब्रास 200 रुपये सवलत

    Devendra Fadnavis : 2047 पर्यंत देशातील अणुऊर्जा उत्पादन 100 गिगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर

    फडणवीस केंद्राची 50 टक्के भागीदारी मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर मेट्रो विस्तार शक्य