वृत्तसंस्था
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्या गँगवर आणि त्याच्याशी लागेबांधे असलेल्या काही राजकीय नेत्यांवर ईडीने छापे घातले आहेत. सध्या मुंबईत ही कारवाई सुरू असून ईडी लवकरच या संदर्भातले तपशील जाहीर करणार आहे. ED raids Dawood aides: ED raids on Dawood Ibrahim gang and related political leaders in Mumbai !!
महत्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये ईडीने मनी लॉन्ड्रिंग संदर्भात जे छापे घालून माहिती गोळा केली आणि तपास केला त्यावर आधारित हे पुढचे छापे आहेत. आणि त्याची लिंक दाऊद इब्राहिम गँगशी आणि राजकीय नेत्यांशी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले काही बडे राजकीय नेते दाऊदशी असलेल्या लिंकमुळे अडचणीत आले आहेत. दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर यालाही ताब्यात घेऊन दाऊद आणि राजकीय नेत्यांच्या लिंक बाबत तपास करण्यात येणार आहे.
आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात टाकण्यात संदर्भातला मोठा गौप्यस्फोट दुपारी 4.00 वाजताच्या पत्रकार परिषदेत करणार आहेत. त्या आधी मुंबईत सी वॉर्ड मध्ये छापे घालून धडक कारवाई केली आहे. त्यामुळे राजकीय आणि कायदेशीर घमासान मुंबईच्या राजकीय पटलावर आज दिसून येणार आहे.
ED raids Dawood aides: ED raids on Dawood Ibrahim gang and related political leaders in Mumbai !!
महत्त्वाच्या बातम्या
- मैत्रीत हिजाब आला अडवा, उडुपीत एकत्र जेवण करणाऱ्या मुली आता हिंदू-मुस्लिममध्ये विभागल्या
- पूर्वोत्तर राज्ये भारताचा भाग नाही, भारताचे वर्णन केवळ ‘गुजरात ते बंगाल’; राहुल गांधीविरोधात तक्रार
- सरकारी नोकऱ्यांमध्ये 21,255 पदे रिक्त दोन वर्षांत 2,65,468 पदे भरली
- रशिया या आठवड्यात युक्रेनवर हल्ला करणार 16 फेब्रुवारी हा हल्ल्याचा दिवस : व्लादिमीर झेलेन्स्की
- गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक : कोश्यारी सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण