• Download App
    डोन्ट से धीस… नो कमेन्ट्स… नाही तर मी निघून जाईन; केंद्रीय मंत्री नारायण राणे भडकले Don't say no, I'll leave; Union Minister Narayan Rane erupted

    डोन्ट से धीस… नो कमेन्ट्स… नाही तर मी निघून जाईन; केंद्रीय मंत्री नारायण राणे भडकले

    वृत्तसंस्था

    सिंधुदुर्ग : डोन्ट से धीस… नो कमेन्ट्स… नाही तर मी निघून जाईन, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे हे काही प्रश्नांना उत्तरे देताना भडकले.
    Don’t say no, I’ll leave; Union Minister Narayan Rane erupted

    जिल्हा मध्यवर्ती बँकेत सत्ता आल्यानंतर नारायण राणे यांन पत्रकार परिषद घेतली. राणे यांनी राजकीय टोलेबाजी केली. पण, पत्रकारांच्या खोचक प्रश्नावर ते भडकले. भाजप नेते नितेश राणे यांच्याविषयी विचारताच राणे भडकले. डोन्ट से धीस…नो कमेन्ट्स आणि नाही तर मी निघून जाईन, अशी विधाने त्यांनी केली.

    नारायण राणेंची प्रारंभीच वॉर्निंग

    नारायण राणे विजयी उमेदवारांशी प्रथम हास्यविनोद करत होते. मात्र, पत्रकार परिषद सुरू होताच त्यांनी पत्रकारांना वॉर्निंग दिली. आपसात बोलू नका तुम्ही. एकदा सुरू झालं की संपेपर्यंत बोलू नका, असे राणे भडकतच म्हणाले.



    नो कॉमेन्ट्स… नाही तर थांबेन

    राजन तेली यांचा पराभव झाल्यामुळे त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो स्वीकारणार का? यावर राणे दुसऱ्यांदा भडकले. तुम्ही तोच तोच मुद्दा उपस्थित केला तर मी नो कॉमेन्ट्स म्हणेल आणि पत्रकार परिषद संपवून टाकेन. तेलींचा राजीनामा स्वीकारायचा की नाही हे पक्षाध्यक्ष ठरवतील.ते जो निर्णय घेतील. तो आम्ही मान्य करू. पण राजनची कुठे तरी वर्णी लावू, असं राणे यांनी स्पष्ट केलं.

    अजून एक केस हवी का?

    नितेश राणे जामीन फेटाळला. पण तुमची प्रतिक्रिया आली नाही, असं विचारलं तेव्हा राणे तिसऱ्यांदा भडकले. नाही नाही. तो कोर्टाचा अधिकार आहे. तुम्हाला माझी प्रतिक्रिया पाहिजे आहे का म्हणजे अजून एक केस. काही लोक प्रयत्न तेच करत आहेत. काही पत्रकारांचं तेच इंटेन्शन आहे, असा आरोप केला.

    डोन्ट से धीस

    नितेश राणे प्रकरणात… असे एका पत्रकाराने उच्चारताच राणे संतप्त झाले. प्रकरण म्हणू नको, डोन्ट से धीस. प्रकरण कसले रे? ती जखम कसली आहे तू दाखवतो का? तो फिर्यादी हात बांधतो. हाताला जखम आहे? कधी विचारला प्रश्न तुम्ही हात असा का बांधतो? बायको हॉस्पिटलमध्ये कामाला आहे म्हणून पट्ट्या बांधून यायचं असं… अरे खरचंटलंय ते. आणि तो काय सत्कार… अर्थमंत्री येतात सत्काराला. काय मार खाल्लास रे कमी. अजून खायला पाहिजे होता. काय आहे हे…, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

    सर्वांना पुरुन उरलोय

    तुम्हालाही नोटीस दिली होती चौकशीसाठी… असं एका पत्रकाराने विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा राणेंनी त्याचा प्रश्न मध्येच तोडला. मग काय करायचं? कुणाची चौकशी? तुम्ही जा मदतीला त्यांच्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी सर्वांना पुरून उरलोय आणि आता केंद्रापर्यंत पोहोचलो. मध्ये नाही थांबलो कुठे मी. समजलं ना… त्यामुळे अशा 160 बीठ चौकशा… मला काय नाही फरक पडत, असं ते तावातावाने बोलले.

    मी पण एक पत्रकार

    पण या नोटीशीत काही तथ्य आहे का? तुम्हाला कोणी बोलायला आले होते का? यावर राणेंचा पारा अधिकच चढला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांनाच फैलावर घेतलं. एक तुम्हाला सांगतो… मला नो कॉमेन्ट्स… अशा चर्चेला मी उत्तर नाही देऊ शकत. पाहिजे तर विचारा, नाही तर मी चाललो. दुसरं काही नाही का… नारायण राणे… नितेश राणे याच्यापलिकडे नाय विचारायला होतं. काय बँकेचं विचारलं?… मी सिंधुदुर्गाचं नाही, महाराष्ट्र आणि देशाचं नेतृत्व करत आहे. मी केंद्रीय मंत्री आहे (हातावर लिहून दाखवत) हांहां… आम्हाला काही प्रतिक्रियेची गरज नाही. प्रतिक्रिया म्हणजे काय चांगलूपणा? प्रतिक्रिया म्हणजे बदनामीच… आम्ही आमची बाजू सांगत बसणं… असं झालं… तसं झालं… काय झेंडा दाखवला का तुम्ही? अरे मला नको सांगू… मी पण एक पत्रकार आहे… आहे ना पत्रकार… प्रहार आहे आमचा… आदर म्हणजे काय… मी आदर करतो… सत्कार करतो मी तुमचा… आदर म्हणजे काय?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

    मी काय ज्योतिषी आहे का?

    महापालिका निवडणुका कोण जिंकेल ? त्यावरही राणेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली. अरे हे संपू दे ना… कोण असेल..? म्हणजे काय..? मी काय ज्योतिषी आहे का?,असे ते म्हणाले.

    Don’t say no, I’ll leave; Union Minister Narayan Rane erupted

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!