• Download App
    षडयंत्र रचले जात असताना महाराष्ट्र एटीएस झोपलय का? ,आशिष शेलार यांचा सवाल; दिल्ली पोलिसांनी धरावीतून दहशतवाद्याला केली अटक|Did Maharashtra ATS sleep while the conspiracy was being hatched? , Ashish Shelar's question; Delhi Police arrest terrorist from Dharavi

    षडयंत्र रचले जात असताना महाराष्ट्र एटीएस झोपलय का? ,आशिष शेलार यांचा सवाल; दिल्ली पोलिसांनी धरावीतून दहशतवाद्याला केली अटक

    वृत्तसंस्था

    मुंबई : नवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली.मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थान सुरु असताना महाराष्ट्र राज्याच दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलय का? असा सवाल भाजप नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केला आहे. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे त्यांच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.Did Maharashtra ATS sleep while the conspiracy was being hatched? , Ashish Shelar’s question; Delhi Police arrest terrorist from Dharavi

    मुंबईत आज पत्रकारांशी संवाद साधताना ॲड. शेलार म्हणाले, नॅान कॅाग्निजेबल ॲाफेन्समध्ये केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलिस आणि पत्रकारांना हात नाही तर पाय सुद्धा लावू ,अशी भाषा करणारे पोलिस अधिकारी, विद्यमान आमदाराला लुकआउट नोटीस काढण्याचा प्रताप करणारे पोलिस दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते.



    हे गृहमंत्री स्पष्ट करतील का?या दहशतवादी प्रकरणाची इंटेलिजन्स माहिती पोलिसांना, गृहमंत्र्यांनी होती तर मग एका विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका अस तर राजकीय प्रकार नाही ना ? असा सवाल त्यांनी केला. पोलिसांच्या इंटेलिजन्स फेल्युअरवर गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

    पोलिसांच लक्ष नको तेथे गुंतविल्याचा परिणाम

    आता सरकार बैठका घेतल्या असल्या तरी झालेल्या अक्षम्य दुर्लक्षावर आता पांघरुण घालता येणार नाही. राजकर्ते पोलिसांच लक्ष नको त्या विषयात घालतात मग अशा घटना घडतात. आमचे पोलिस सक्षम आहेत

    पण राजकीय दबाव, सरकारची गटबाजी, वसुलेबाजी, आणि सौदेबाजी यामुळे ही स्थिती आली असेही ते म्हणाले. चौकशी अजून वाढवावी आणि गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, आवाहन ॲड. शेलार यांनी केले आहे.

    Did Maharashtra ATS sleep while the conspiracy was being hatched? , Ashish Shelar’s question; Delhi Police arrest terrorist from Dharavi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!