• Download App
    धनंजय मुंडे - करुणा मुंडे यांच्यावर सिनेमा आला तर "सुपरहिट" ठरेल; जनतेला वास्तव समजेल; करुणा मुंडेंचा टोला!! Dhananjay Munde - If Karuna Munde gets a movie, it will be a "super hit"

    धनंजय मुंडे – करुणा मुंडे यांच्यावर सिनेमा आला तर “सुपरहिट” ठरेल; जनतेला वास्तव समजेल; करुणा मुंडेंचा टोला!!

    प्रतिनिधी

    पंढरपूर : देशात सध्या “द काश्मीर फाईल्स” या सिनेमा वरून जोरदार वादळ सुरू आहे. पण जर धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या नात्यावर सिनेमा आला, तर तो सुपरहिट ठरेल. महाराष्ट्रातले राजकीय नेते कसे वागतात याचे वास्तव चित्र जनतेसमोर येईल, असा टोला करुणा मुंडे यांनी लगावला आहे. अनेक निर्मात्यांनी हा सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे त्या म्हणाल्या.Dhananjay Munde – If Karuna Munde gets a movie, it will be a “super hit”


    Dhananjay Munde : हिंदूंमध्ये दुसरं लग्न करता येत नाही ही कुठली नैतिकता?भाजप करूणा मुंडे यांच्या मागे उभं राहणार : चंद्रकांत पाटील


    – कोल्हापूर उत्तर मधून लढणार

    करुणा मुंडे या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार आहेत. तेथून अर्ज भरण्यापूर्वी त्या पंढरपूर मध्ये विठ्ठलाचे दर्शन घ्यायला आल्या होत्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार प्रहार केले. धनंजय मुंडे हे पाच – सहा मुलांचे वडील आहेत. तरी ते अजून मंत्रिपदावर कायम का आहेत?, या विषयी महाराष्ट्र चर्चा झाली पाहिजे. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या संबंधांवर जर सिनेमा काढला तर तो सुपरहिट ठरेल आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर महाराष्ट्रातले राजकीय नेते कसे वागतात, याचे वास्तव चित्र समोर येईल.

    – करुणा मुंडे यांना तुरुंगात का टाकले?

    धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना तुरुंगात टाकले. त्याचे काय कारण होत?, हे जनतेला समजले पाहिजे. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या पत्नींनी माझ्याशी संपर्क साधला आहे. त्या माझ्यासमवेत शिवशक्ती पक्षात यायला तयार आहेत, याकडे देखील करुणा मुंडे यांनी लक्ष वेधले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत असले तरी 2024 मध्ये परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्याविरोधात लढणार असल्याचा निर्धार करुणा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

    Dhananjay Munde – If Karuna Munde gets a movie, it will be a “super hit”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल