Thursday, 8 May 2025
  • Download App
    देवेंद्र फडणवीस गॉडफादर, मुख्यमंत्री केले तरी कॉँग्रेसमध्ये जाणार नाही, रमेश जारकीहोली यांनी केले स्पष्ट|Devendra Fadnavis is my Godfather, will not join Congress even if he becomes Chief Minister, Ramesh Jarkiholi clarified

    देवेंद्र फडणवीस गॉडफादर, मुख्यमंत्री केले तरी कॉँग्रेसमध्ये जाणार नाही, रमेश जारकीहोली यांनी केले स्पष्ट

    महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर आहेत. कॉँग्रेसने मुख्यमंत्री केले तरी कॉँग्रेसमध्ये जाणार नाही असे कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश जारकीहोली यांनी स्पष्ट केले आहे. आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.Devendra Fadnavis is my Godfather, will not join Congress even if he becomes Chief Minister, Ramesh Jarkiholi clarified


    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर आहेत. कॉँग्रेसने मुख्यमंत्री केले तरी कॉँग्रेसमध्ये जाणार नाही असे कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश जारकीहोली यांनी स्पष्ट केले आहे. आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

    मागील काही दिवसांपासून जारकीहोली पक्षातील काही नेत्यांबाबत नाराज असल्याचे समोर आले होते. याबाबत त्यांनी फडणवीसांची भेट घेत चर्चा केली. मात्र, भेटीतील चचेर्चे तपशील देण्यास नकार दिला. रमेश जारकीहोली म्हणाले, मी माझ्या नाराजीबद्दल केवळ जवळच्या मित्र आणि अनुयायांसोबतच चर्चा केली होती. ही माहिती माध्यमांपर्यंत कशी पोहचली याची मला कल्पना नाही. मात्र, मित्र, शुभचिंतक आणि वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर मी माझ्या आमदारकीच्या राजीनाम्याचा विचार सोडून दिला आहे.



    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने दिलेला सन्मान काँग्रेसमध्ये 20 वर्षे असताना मिळाला नाही असे सांगून जारकीहोली म्हणाले, मला पुन्हा मंत्री होण्यात कोणताही रस नाही. देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर आहेत. म्हणूनच मी त्यांची भेट घेतली. काँग्रेस बुडतं जहाज आहे. मी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा विचारही करत नाही.

    रमेश जारकीहोली यांनी आपला मुंबई दौरा राजकीय असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, मी याबाबत खोट बोलणार नाही. हे खरं आहे की मी मुंबईला माझे गॉडफादर देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो होतो. यात मी त्यांच्याशी पक्षामधील नाराजीसह राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.

    Devendra Fadnavis is my Godfather, will not join Congress even if he becomes Chief Minister, Ramesh Jarkiholi clarified

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस