विशेष प्रतिनिधी
मुंबई – राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या नव्या १० रुग्णांची नोंद झाल्याने राज्याची चिंता वाढली आहे. आतापर्यंत राज्यात डेल्टा प्लसमुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण ७६ रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे.Delta plus patients increased in Maharashtra
आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लसच्या ७६ रुग्णांपैकी सर्वाधिक ३९ प्लस रुग्ण हे १९ ते ४५ वयोगटातील आहेत. त्याखालोखाल ४६ ते ६० वयोगटातील १९ रुग्ण आहेत. १८ वर्षांखालील नऊ बालके असून ६० वर्षांवरील नऊ रुग्ण आहेत.
नव्याने सापडलेल्या १० रुग्णांपैकी सहा रुग्ण कोल्हापुरातील असून रत्नागिरीतील तीन; तर एक जण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. हे दहाही रुग्ण कोविडमधून बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन मृत्यू रत्नागिरीतील; तर बीड, मुंबई आणि रायगडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहेत. जिनोम सिक्वेंसिंग तपासणीतून राज्यात ८० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.
Delta plus patients increased in Maharashtra
विशेष प्रतिनिधी
- अमेरिका बाहेर पडताच तालिबानशी मैत्रीला चीनने दर्शविली तयारी
- ‘पेगॅसस’ प्रकरणी तज्ञांची समिती स्थापन करण्याची मोदी सरकारची तयारी
- चांगल्या बाबी आठवा. त्यातून मिळालेला आनंदाची पुन्हा अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा
- तालिबानी सैन्यात दोन मल्याळम नागरिकांचा समावेश, काँग्रेसचे नेते शशी थरुर यांचे ट्विट
- रक्तपात व काबूल बेचिराख होण्यापासून थांबवण्यासाठी देश सोडला, अश्रफ घनी यांचा दावा