विशेष प्रतिनिधी
मुंबई : राजकारणात विरोध असावा मात्र द्वेष नसावा, असे म्हटले जाते. परंतु, अनेक नेते हे विसरतात. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचेही असेच झाले असून नारायण राणे यांच्यावर टीका करताना बरळले आहेत. नारायण राणेंच्या मुलांसारखी मुले महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असे जाधव यांनी म्हटले आहे.Criticizing Narayan Rane, Bhaskar Jadhav said that children like his should not be born in Maharashtra
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जाधव म्हणाले, नारायणराव राणेंना मी सल्ला देऊन काही फायदा नाही. कारण त्यांची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन.
महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरामोठ्यांचा आदर करणाऱ्या राज्यामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात मतमतांतर वेगळी असू शकतात पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचं अजिबात भानं नाही. आपण कोणाबद्दल काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुलं आहेत किंवा नारायण रावांबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नाही.
जाधव म्हणाले, नारायण राणेंचा शिवसेनेच्या वाढीवमध्ये काडीचा हातभार नाही. त्यांनी स्वत:भोवती ते वलय तयार केलं आहे. नारायण राणेंना माध्यमांनी मोठं केलं आहे आणि शिवसेना सोडल्यापासून शिवसेनेला शिव्या देऊन त्यांनी आपलं अस्तित्व टिकवलं आहे. यापेक्षा नारायण राणेंचा काही करिश्मा नाही.
नारायण राणेंनी जेंव्हा शिवसेना सोडली तेव्हा ९ आमदार त्यांच्याबरोबर गेले. दुसºया निवडणुकीमध्ये एक तरी आमदार निवडून आला का? त्याच्या पुढच्या निवडणुकीत ते स्वत: निवडून आले का? त्यांचा मुलगा पुन्हा निवडून आला का? ते वांद्रे येथून उभे राहिले तेव्हा निवडून आले का?
त्यांनी आपला पक्ष काढला आणि त्याचा वर्धापन दिन साजरा करण्याऐवजी वर्ष पूर्ण होण्याआधी त्याचं वर्षश्राद्ध घातलं. स्वत:च्या मुलाला निवडूण आणू शकत नाही म्हणून भाजपाच्या दरवाजात जाऊन उभे राहिले. ते काय शिवसेनेला शिव्या देणार आणि कसली पाळमुळं रोवणार.
Criticizing Narayan Rane, Bhaskar Jadhav said that children like his should not be born in Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जलवा, ट्विटर अकाऊंट सात कोटी फॉलोअर्स
- टाटा मोटर्स पुढील आठवड्यात वाढविणार मोटारींच्या किंमती, टियोगो, नेक्सॉन, हैरियार आणि सफारी होणार महाग
- बड्या घरचे श्वान शोधण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा लागली कामाला, पाकिस्तानातील गुजराणवाला येथील प्रकार
- बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी केंद्राने संसदेने मंजूर केले बाल न्याय सुधारणा विधेयक