वृत्तसंस्था
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं असून गोमूत्र शिंपडण्यावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार निर्माण करा”, असा खोचक सल्ला दिला आहे.”Create employment instead of sprinkling cow urine”, Narayan Rane strongly criticizes Shiv Sena
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. ही यात्रा मुंबई महपालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचं मानल जात आहे. यावेळी नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने मी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालो आहे.
मी मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात जाण्याची संधी दिल्याबद्द्ल मी त्यांचा ऋणी”, असं ते म्हणाले. शिवसेनेवर निशाणा साधताना ते म्हणाले, “वीज पुरवठा नाही राज्यात म्हणून ३५० कंपन्या बंद आहेत. मी प्रयत्न करणार असून इथल्या मंत्र्यांशीही बोलणार आहे. ३५० कंपन्या बंद असल्याने ३ लाख कामगार बेरोजगार झाले आहेत.
गोमूत्र शिंपडत राहण्यापेक्षा रोजगार त्यांना द्या. नको उद्योग करण्यापेक्षा हवे ते व्यवसाय करावेत. राज्यातील युवकांना रोजगार द्यावा. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करून द्या. देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातभार लावावा.” असे नारायण राणे म्हणाले.
Create employment instead of sprinkling cow urine”, Narayan Rane strongly criticizes Shiv Sena
महत्त्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे म्हणाले सत्ता समोर दिसत नसल्याने एकत्र आलोय पण..
- राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणतात, “राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तो पक्ष लोकांनी डोक्यावर घेतला…!!”
- सराफ व्यापाऱ्यांचा २३ ऑगस्टला बंद हॉलमार्क युनिक इडेंटिफिकेशन नंबरमुळे अडचण
- कलाकारांना किमान खड्डे बुजविण्याची तरी काम द्या; ‘ठाकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांचा राज्य सरकारवर निशाणा