विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला पाहिजे.Congress should withdraw support
काँग्रेसला मुख्यमंत्रिपद दिले जात नसेल तर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केले आहे.
राज्यात सध्या पडद्याआड अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. भेटी गाठींना तसेच करुघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे मानले जाते. त्यातच विविध पक्षांचे नेते वेगवेगळी वक्तव्ये करून राजकारणात संभ्रम निर्माण करीत आहेत
नाना पटोले यांनी नुकतीच राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल; तसेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनण्यास नाना पटोले यांची तयारी असल्याची इच्छा स्वतः व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला पाहिजे आणि मुख्यमंत्रिपद मिळविले पाहिजे.
मुख्यमंत्रिपद देण्यास महाविकास आघाडी सरकार तयार नसेल तर पाठिंबा काढला पाहिजे, असे आवाहन आठवले यांनी पटोले यांना केले.
Congress should withdraw support
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात बहुतांश जिल्ह्यांत घटतोय कोरोनाच पॉझिटिव्हिटी दर, कोल्हापुरात मात्र वाढ
- ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बोझेस आणि बंधू मार्क २० जुलैला अवकाशात फेरी मारणार
- उत्तराखंडमध्ये आता तीन जिल्ह्यास चारधाम यात्रेस परवानगी
- ताजमहाल, कुतुबमीनार, वेरूळ अजिंठा लेणी पर्यंटकांसाठी उद्यापासून खुली
- सीतेच्या भूमिकेवरून सिनेअभिनेत्री करिना कपूर ट्रोल, नेटकऱ्यांचा बहिष्काराचा इशारा