• Download App
    मिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही ‘नीट’ परीक्षा रद्द करा; बारावीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश देण्याची काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी । Cancel ‘Neat’ exams in Maharashtra; Congress demands CM to give medical admission to students on 12th standard marks

    तमिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही ‘नीट’ परीक्षा रद्द करा; बारावीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश देण्याची काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    वृत्तसंस्था

    मुंबई : तमिळनाडूप्रमाणेच महाराष्ट्रातही वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. Cancel ‘Neat’ exams in Maharashtra; Congress demands CM to give medical admission to students on 12th standard marks

    पूर्वीप्रमाणेच राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेतील गुणांवर हे प्रवेश द्यावेत, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. या संदर्भातील पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविले आहे.

    नीटमध्ये सीबीएससी व इतर केंद्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांची संख्या ही राज्य परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक आहे. दुसरीकडे महागड्या खासगी शिकवण्या लावणे गरीब विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. परिणामी ग्रामीण व सामान्य कुटुंबांतील विद्यार्थी डॉक्टर होण्यापासून वंचित रहात आहेत. शिक्षणातील ही असमानता दूर करण्यासाठी नीट परीक्षा रद्द करावी. पूर्वीप्रमाणे राज्य मंडळाच्या परीक्षेतील गुणांवर आधारित वैद्यकीय प्रवेश सुरू करावेत, अशी त्यांनी मागणी करण्यात आली आहे.



    तामिळनाडूत नीट परीक्षेत नापास होऊ या भीतीने गरीब विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तसेच त्या वाढत असल्याने तमिळनाडू सरकारने आत्महत्येचे कारण बनलेली नीट परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला असून तसेच विधेयक मंजूर केले आहे. अशाच प्रकारचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

    महिलांवरील वाढत्या अत्याचारावर चिंता

    दरम्यान, राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना हा चितेंचा विषय बनला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शहरांतील गृहनिर्माण संस्थांमध्ये पुरुष सुरक्षारक्षकांबरोबर महिला सुरक्षारक्षकही नेमावेत, अशी मागणी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

    Cancel ‘Neat’ exams in Maharashtra; Congress demands CM to give medical admission to students on 12th standard marks

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!