• Download App
    राज्यसभेच्या सहा जागांसाठी ४ ऑक्टोबरला पोटनिवडणूक, राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त जागेचीही निवडणूक|By-polls for six Rajya Sabha seats on October 4, election on Rajiv Satav's seat in Maharashtra

    राज्यसभेच्या सहा जागांसाठी ४ ऑक्टोबरला पोटनिवडणूक, राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त जागेचीही निवडणूक

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: राज्यसभेतील सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. ४ ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरही पोटनिवडणूक होणार आहे.By-polls for six Rajya Sabha seats on October 4, election on  Rajiv Satav’s seat in Maharashtra

    महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवरील पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी ही माहिती दिली. त्याची अधिसूचना १५ सप्टेंबरला जारी केली जाईल.



    महाराष्ट्रात काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. मध्य प्रदेशातील थावरचंद गेहलोत यांनी राजीनामा दिल्याने जागा रिक्त झाली आहे.

    तामिळनाडू येथील केपी मुनुसामी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली. त्यांचा कार्यकाळ २०२६ पर्यंत होता. येथीलच आर. वैथिलिंगम यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे, ज्यांचा कार्यकाळ २०२२ पर्यंत होता

    .मानस रंजन भुनिया यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एक जागा रिक्त झालीआहे. मानस भुनिया आता ममता सरकारमध्ये मंत्री आहेत. बिसजित डमरे यांच्या राजीनाम्यानंतर आसाममध्ये एक जागा रिक्त झाली आहे.

    १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर आहे. ४ ऑक्टोबर रोजी मतदान होईत तसेच त्याच दिवशी मतमोजणी देखील होईल.

    By-polls for six Rajya Sabha seats on October 4, election on  Rajiv Satav’s seat in Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!