विशेष प्रतिनिधी
मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि बीजेपी नेते किरीट सोमय्या यांच्यामधील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. नुकताच हाती आलेल्या बातमीप्रमाणे किरीट सोमय्या अखेर कोल्हापूरला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. महालक्ष्मी एक्स्प्रेसने ह्या पॅसेंजर ट्रेनने ते कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले आहेत. ही माहिती खुद्द किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवर वरून दिली आहे. अंबाबाईच्या दर्शनाची संधी मिळावी असेही त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे.
Bjp leader kirit somaiya has finally left for kolhapur, irrespective of detention order
आज सकाळी किरीट सोमय्या यांना त्यांच्या राहत्या घरीच स्थानबद्ध केल्यानंतर बऱ्याच भाजप नेत्यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून व्यक्त केल्या होत्या. भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील आपले मत व्यक्त करताना म्हणाले होते की,’किरीट सोमय्या दरोडेखोर आहेत की आतंकवादी आहेत? त्यांना कोल्हापूरमध्ये येण्यास बंदी का केली जात आहे? सरकारने याचे उत्तर द्यावे.’
आपले मत व्यक्त करताना चंद्रकांतदादा पाटील यांनी असेही म्हटले आहे की, किरीट सोमय्या यांना तुम्ही कधी अटक करणार आहात? तशी कायदेशीर लेखी नोटीस तुम्ही का देत नाहीये? सर्व यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करताना दिसून येते. किरीट सोमय्या यांना गणपती विसर्जनासाठी देखील जाऊ दिले नाही. याचा अर्थ काय? असा परखड सवाल पाटील यांनी विचारला आहे.
Bjp leader kirit somaiya has finally left for kolhapur, irrespective of detention order
महत्त्वाच्या बातम्या
- डोंबिवलीत पाण्यापाई तरुणीचा हात मोडला कल्याण-डोंबिवलीत २७ गावे तहानलेली
- दोन प्रौढ व्यक्तींना धर्माचा विचार न करता जोडीदार निवडण्याचा अधिकार, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा
- फौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही
- मोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप