• Download App
    मोठी बातमी : सीटीईटीचा दि. 16 डिसेंबरचा दुसरा पेपर रद्द, सर्व्हर डाऊन असल्याचे दिले कारण, परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा पुन्हा हिरमोड । Big news CTET The second paper of 16th December canceled Due to server down

    मोठी बातमी : सीटीईटीचा दि. १६ डिसेंबरचा दुसरा पेपर रद्द, सर्व्हर डाऊन असल्याचे दिले कारण, परीक्षार्थ्यांचा संताप

    CTET The second paper of 16th December canceled : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. सीटीईटीचे पेपर १ आणि पेपर २ अशा दोन्ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपात आजपासून सुरू झाल्या आहेत. ही परीक्षा दि. 16 डिसेंबर ते 13 जानेवारीपर्यंत दररोज दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मात्र, आज पहिल्याच दिवशी सकाळी पेपर १ व्यवस्थित झाल्यानंतर दुपारच्या शिफ्टमध्ये पेपर २ साठी तांत्रिक अडचणींचा हवाला देत परीक्षा रद्द करण्यात आली आहे. Big news CTET The second paper of 16th December canceled Due to server down


    प्रतिनिधी

    औरंगाबाद : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. सीटीईटीचे पेपर १ आणि पेपर २ अशा दोन्ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपात आजपासून सुरू झाल्या आहेत. ही परीक्षा दि. 16 डिसेंबर ते 13 जानेवारीपर्यंत दररोज दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मात्र, आज पहिल्याच दिवशी सकाळी पेपर १ व्यवस्थित झाल्यानंतर दुपारच्या शिफ्टमध्ये पेपर २ साठी तांत्रिक अडचणींचा हवाला देत परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तथापि, पेपरफुटीचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    दुसऱ्या शिफ्टसाठीही परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. विद्यार्थ्यांना केंद्रावर नियमित तपासणी करून प्रवेशही देण्यात आला. परंतु 2.30 वाजूनही परीक्षा काही सुरू झाली नाही. सुमारे तास-दीड तास विद्यार्थ्यांना बसवून ठेवल्यानंतर दुसऱ्या पेपरची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना यासाठी तांत्रिक अडचणींचे कारण सांगण्यात आले. सर्व्हर डाऊन असल्याने परीक्षा होऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. दरम्यान, दुसऱ्या शिफ्टचा पेपर देशभरात बहुतांश ठिकाणी रद्द झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याबाबत परीक्षा केंद्रांबाहेर परीक्षा पुढे ढकलल्याची नोटीस डकवण्यात आली आहे.

    अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. परीक्षांच्या आयोजनात वारंवार अडथळे येत असल्याचे दिसून आले आहे. मागच्या काही काळात यूपी टीईटी, राज्यातील म्हाडा तसेच राज्याची टीईटी परीक्षाही अशीच पुढे ढकलण्यात आली होती. वारंवार होणाऱ्या या विलंबामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

    दरम्यान, आज रद्द झालेला पेपर २ पुन्हा केव्हा होणार, याबाबत सीटीईटीकडून अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही. परंतु १३ जानेवारीपर्यंत इतर विद्यार्थ्यांचीही परीक्षा होणार आहे, यासाठी परीक्षा केंद्रही बुक आहेत. यामुळे आज रद्द झालेल्यांचे पेपर १३ जानेवारीनंतरच होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी सीटीईटीचे अधिकृत संकेतस्थळ पाहावे, अशा सूचना देण्यात येत आहेत.

    Big news CTET The second paper of 16th December canceled Due to server down

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhagan Bhujbal : राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी

    Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचे 5 दिवसांत 60 लाख फॉलोअर्स; जाहीरनामा प्रसिद्ध- महिलांना 50% आरक्षण, CJI ना राज्यसभेवर पाठवणार नाही

    NEET Re-Exam : नीट फेर-परीक्षेपूर्वी बनावट टेलिग्राम चॅनेलवर कारवाई; शिक्षणमंत्री म्हणाले- त्वरित ब्लॉक करा; पेपरफुटी प्रकरणात 5 आरोपींना तुरुंगात पाठवले