• Download App
    सावधान ! आता प्रजासत्ताक दिनानिमित्त गाडीवर तिरंगा लावून फिरण ठरणार बेकायदेशीर , जाणून घ्या कारण। Be careful! Now it will be illegal to drive a tricolor on the occasion of Republic Day, know because

    सावधान ! आता प्रजासत्ताक दिनानिमित्त गाडीवर तिरंगा लावून फिरण ठरणार बेकायदेशीर , जाणून घ्या कारण

    सध्या देशात प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू झाली आहे.या दिवसासाठी तिरंगा बाजारात उपलब्ध झाले आहेत. Be careful! Now it will be illegal to drive a tricolor on the occasion of Republic Day, know because


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आपल्या भारत देशाचा ध्वज स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, आणि राज्यांचे स्थापना दिवस या दिवशी फडकविण्यात येतो. तसेच या दिवशी सार्वजनिक ठिकाणे,सरकारी कार्यालय, तसेच लहान छोटी गावे अश्या सर्व ठिकाणी ध्वजारोहण केले जाते.विशेष म्हणजे देशाच्या कोपऱ्यापर्यंत हा उत्सव साजरा केला जातो.

    दरम्यान सध्या देशात प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू झाली आहे.या दिवसासाठी तिरंगा बाजारात उपलब्ध झाले आहेत.महत्वाची बाब म्हणजे लोक हे ध्वज त्यांच्या कपड्यांना लावतात.दरम्यान काही लोक आपल्या गाडीला देखील लावतात. परंतु ध्वज फडकवण्यासाठी अनेक कायदेशीर नियम आहेत आणि आपल्याला ते नियम माहित नसतात.



    नेमके काय आहेत ध्वज फडकवण्यासाठी नियम

    राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी भारतीय ध्वज संहिता 2002 तयार करण्यात आली आहे. यामध्ये ध्वजारोहणाबाबत अनेक नियम लागू करण्यात आले आहेत.तसेच राष्ट्रध्वजाचा वापर कसा करावा हे सांगण्यात आले आहे. या ध्वजसंहितेमध्ये काही लोकांना कारमध्ये (मोटार-कार) झेंडा लावण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

    हे लोक आपल्या गाडीला झेंडा लावू शकतात

    राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि नायब राज्यपाल, पंतप्रधान आणि इतर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री, मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री, तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या गाडीत झेंडा लावू शकतात.

    सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश?

    2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक भारतीयाला तिरंगा फडकवण्याचा अधिकार आहे. मात्र, गाडीवर तिरंगा लावण्याचा अधिकार फार कमी लोकांना मिळाला आहे आणि सामान्य माणूस तो झेंडा गाडीसमोर लावण्यासाठी वापरू शकत नाही.

    Be careful! Now it will be illegal to drive a tricolor on the occasion of Republic Day, know because

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर