• Download App
    औरंगाबाद : कोरोना रुग्णांना अवाढव्य बिल आकारणाऱ्या हॉस्पिटलविरोधात नोटीस , महापालिकेकडून कारवाईAurangabad: Notice against hospital charging huge bills to Corona patients, action taken by Municipal Corporation

    औरंगाबाद : कोरोना रुग्णांना अवाढव्य बिल आकारणाऱ्या हॉस्पिटलविरोधात नोटीस , महापालिकेकडून कारवाई

    संबंधित 12 रुग्णालयांना नोटिसा जारी करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.Aurangabad: Notice against hospital charging huge bills to Corona patients, action taken by Municipal Corporation


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना अवाढव्य बिल लावले गेले होते. दरम्यान ज्या ज्या रुग्णालयांनी जास्त बिल लावले त्या रुग्णालयांविरोधात औरंगाबाद महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाकडून विविध रुग्णालयांची तपासणी ऑडिटरमार्फत करण्यात आली होती.

    दरम्यान अतिरिक्त बिल घेतलेल्या रुग्णालयांची यादी महापालिकेला प्रशासनाकडून प्राप्त झाली. त्यानुसार, संबंधित 12 रुग्णालयांना नोटिसा जारी करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.



     

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची ऑक्सिजनची पातळी झपाट्याने कमी होत होती.त्यामुळे बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती.अशा स्थितीत बेड्स मिळणे कठीण होते.जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून किती बिल आकारावे, यासंबंधीचे नियम ठरवून दिले होते.मात्र हे नियम धाब्यावर बसवत काही रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात बिलांची वसुली केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती.

    Aurangabad: Notice against hospital charging huge bills to Corona patients, action taken by Municipal Corporation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sudhir Mungantiwar : राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज; TET पेपरफुटी प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

    Lohagad Murder Case : सियाने केतनकडून ₹1 कोटी घेऊन चेतनला दिले; कॅब ड्रायव्हरचा दावा – सियाची बालीला जाण्याची इच्छा नव्हती, पासपोर्टही गायब केला

    Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी भाजपची नव्हे, स्वतःच्या पक्षाची चिंता करावी; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, ‘खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच’ असल्याचा पुनरुच्चार