• Download App
    बांगलादेशींना संरक्षण देणा‍ऱ्या ममता यांच्याशी कुठले आले कौटुंबिक संबध, आशिष शेलार यांचा शिवसेनेवर हल्ला|Ashish Shelar's attack on Shiv Sena, What is the family relationship of Mamata who protects Bangladeshis?

    बांगलादेशींना संरक्षण देणा‍ऱ्या ममता यांच्याशी कुठले आले कौटुंबिक संबध, आशिष शेलार यांचा शिवसेनेवर हल्ला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र भेटीवरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे. बांगलादेशींना संरक्षण देणा‍ऱ्या ममता यांच्याशी कुठले आले कौटुंबिक संबध, असा सवालही शेलार यांनी केला आहे.Ashish Shelar’s attack on Shiv Sena, What is the family relationship of Mamata who protects Bangladeshis?

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे आणि ममता यांच्या भेटीची अधिकृत माहिती राज्य सरकारने जाहीर केली पाहिजे.



    हे एक कटकारस्थान असून, येथील उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाण्यास सत्ताधारी शिवसेना मदत तर करीत नाही ना, असा सवाल आशिष शेलार यांनी केला.बॅनर्जी यांची आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वतीने ही भेट आपण घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

    या गुप्त बैठकीत कटकारस्थान तर नाही ना शिजले, असा सवाल शेलार यांनी केला आहे. ममतांचे महाराष्ट्रात सरकारी पक्षांनी स्वागत केले. ते प्रथेप्रमाणे अपेक्षितच आहे. मात्र, त्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेली भेट व त्यांची झालेली बैठक कशासाठी होती,

    महाराष्ट्रात कोणीही आले की, आमचा कौटुंबिक स्नेह असल्याचे सांगून या भेटी घेतल्या जातात. तुमचा कौटुंबिक स्नेह असेलही. आम्हाला त्याबद्दल काय करायचे आहे, पण महाराष्ट्राचा त्याच्याशी काय सबंध असे त्यांनी विचारले आहे.

    Ashish Shelar’s attack on Shiv Sena, What is the family relationship of Mamata who protects Bangladeshis?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!