• Download App
    पोलीसांकडून आरोपी पाठराखण होत असल्याने शेतकऱ्याच्या मुली संतप्त, धनंजय मुंडे यांची गाडी अडवून विचारला जाब|As the accused is being supported by the police, the farmer's daughters got angry and stopped Dhananjay Munde's car.

    पोलीसांकडून आरोपी पाठराखण होत असल्याने शेतकऱ्याच्या मुली संतप्त, धनंजय मुंडे यांची गाडी अडवून विचारला जाब

    विशेष प्रतिनिधी

    बीड : पोलीस आरोपींची पाठराखण करत असून आरोपींना अटक करावी या मागणीसाठी मयत शेतकऱ्याच्या मुलींनी पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी अडवली. आमचे वडील गेले आता तरी न्याय द्या अशी मागणी या मुलींनी केली. धनंजय मुंडे यांनी दोन वेळा अश्वासन दिलेले मात्र अद्यापही काहीच कारवाई न झाल्याने या मुलींनी संताप व्यक्त केला.As the accused is being supported by the police, the farmer’s daughters got angry and stopped Dhananjay Munde’s car.

    एका कार्यक्रमातून बाहेर निघताना मुलींनी धनंजय मुंडे यांच्या गाडी समोर येत गाडी थांबवली आणि गाऱ्हाणे मांडायला सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी त्या मुलींना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या विरोध झुगारत या मुलीने थेट धनंजय मुंडेंजवळ पोहोचल्या.



    बीडच्या वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे संभाजी वडचकर यांचा भावकीच्या वादातून मारहाणीत गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी वडवणी पोलिसात गुन्हा दाखल आहे. मात्र यात 302 चे कलम वाढविलेले नाही,

    तसंच आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटकही केली नाही, पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत या वडचकर यांच्या किर्ती व प्रिती या दोन मुलींनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पालकमंत्र्यांसमोर उपस्थित केला.

    बीड जिल्ह्यातील लहान-मोठा प्रकरणात थेट पीडितांना पालकमंत्री महोदयांच्या गाडीला आडवे थांबावे लागते तसंच पालकमंत्र्यांनी दोन वेळा दिलेल्या आश्वासन देखील पूर्ण होत नाही. यामुळे जिल्ह्यातील एकूणच कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात संताप व्यक्त केला जात आहे.

    As the accused is being supported by the police, the farmer’s daughters got angry and stopped Dhananjay Munde’s car.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ