• Download App
    कॉँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर आल्यास झोडपून काढू, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा इशारा|If Congress workers come in front of BJP office, we will get rid of them, warned former Agriculture Minister Anil Bonde

    कॉँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर आल्यास झोडपून काढू, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर आल्यास त्यांना झोडून काढू असा इशारा भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.If Congress workers come in front of BJP office, we will get rid of them, warned former Agriculture Minister Anil Bonde

    नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माफी मागण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी माफी न मागितल्यास काँग्रेस कार्यकर्ते भाजपच्या राज्यभरातील कार्यालयांवर आंदोलन करण्याचा इशारा पटोलेंनी दिला होता. त्यांच्या या इशाºयाला अनिल बोंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे.



    बोंडे म्हणाले, महाराष्ट्रात सगळ्या भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार. भाजपने माफी मागावी म्हणून. खरंतर याच लोकांनी छत्रपती शिवाजी माफी मागायला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रमध्ये कोरोनाच्या काळात ते कोणाच्याच कामाला आले नाहीत. मुख्यमंत्री फिरकले नाहीत, नाना पटोले फिरले नाहीत.

    लोकांना वाºयावर सोडून दिलं आणि म्हणून जर हा गमजा करत असेल आणि उद्या काँग्रेसचे एक काळे कुत्रे जरी भाजपच्या कार्यालयावर आलं तर त्याला झोडल्याशिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाही. हे नाना पटोलेंनी लक्षात ठेवावे. नाना पटोले यांचे काँग्रेसचे कार्यकर्ते उद्या किती वाजता भाजपच्या कार्यालयासमोक येत आहेत ते त्यांनी सांगावं.

    आमचे सगळे कार्यकर्ते तयार राहतील. काँग्रेसवाल्यांना माफी मागायला हवी. ते दारु सुरु करतात. कोरोनाच्या काळात दारुचा टॅक्स कमी करतात. दारुच्या दुकानदाराला लायसन्सची फी कमी करतात. आणि कोरोना संपण्याच्या आधीच वाईन किराणा दुकाणात आणतात. माफी यांनी मागायला हवी आणि ते आम्हाला शहाणपणा शिकवतात. ते आम्ही सहन करणार नाही.

    If Congress workers come in front of BJP office, we will get rid of them, warned former Agriculture Minister Anil Bonde

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!