• Download App
    आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, आर्यन खानची सुटका होणार का?|Aryan Khan's bail application to be heard in Mumbai High Court today, will Aryan Khan be released?

    आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, आर्यन खानची सुटका होणार का?

    पुन्हा एकदा आर्यनच्या सुटकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे की , त्याला जामीन मिळणार की त्याला आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे.Aryan Khan’s bail application to be heard in Mumbai High Court today, will Aryan Khan be released?


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अडकलेला आर्यन खान सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे.आर्यनच्या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.२० ऑक्टोबर रोजी मुंबई सत्र न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

    मात्र याच दरम्यान आर्यनच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. म्हणजेच पुन्हा एकदा आर्यनच्या सुटकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे की , त्याला जामीन मिळणार की त्याला आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे.



    आर्यनच्या जामिनासाठी त्याच्या वकिलाने आत्तापर्यंत अनेकवेळा जामीन अर्ज दाखल केला आहे, पण प्रत्येक वेळी कोर्टाने कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याची याचिका फेटाळली आहे.

    याप्रकरणी शेवटची सुनावणी २० ऑक्टोबर रोजी झाली होती.ज्यामध्ये कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्या दिवशी आर्यनची सुटका होईल असे सर्वांना वाटत असले तरी जामीन अर्ज फेटाळण्याचा कोर्टाचा निर्णय सर्वांनाच धक्का देणारा होता.

    Aryan Khan’s bail application to be heard in Mumbai High Court today, will Aryan Khan be released?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात