• Download App
    पुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई; संतप्त नागरिकांचा आत्मदहनाचा प्रयत्न|Anti-encroachment action in Ambil-Odha area of ​​Pune; Attempted self-immolation of angry citizens

    पुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई; संतप्त नागरिकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

    वृत्तसंस्था

    पुणे : आंबिल-ओढा परिसरातील झोपडपट्ट्यांवर महापालिकेने गुरुवारी ( ता.२४) अतिक्रमणविरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील वातावरण तंग बनले. Anti-encroachment action in Ambil-Odha area of ​​Pune; Attempted self-immolation of angry citizens

    अतिक्रमणविरोधात कारवाई सुरु होताच स्थानिक नागरिक आक्रमक झाले. त्यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला तर काही नागरिकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापटही झाली. खबरदारीचा उपाय म्हणून मोठा फौजफाटा पोलिसांनी तैनात केला आहे.



    पावसाळा सुरु असताना महापालिकेने अचानक जेसीबीने कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. पाच ते सहा जेसीबींच्या सहाय्याने ही कारवाई सुरु आहे. या भागातील घरांतून नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढले आहे.

    मालकी महापालिकेची आणि नोटिस बिल्डरची

    आंबिल ओढा परिसरातील हा प्लॉट पुणे महापालिकेच्या मालकीचा असून रहिवाशांना केदार बिल्डर्सकडून अतिक्रमणाची नोटिस पाठवल्याची तक्रार नागरिकांनी केली. ही महापालिकेची जागा असली तरी महापालिकेकडून नोटिस आली नसल्याचं नागरिकांनी सांगितलं. या संदर्भात बुधवारी महापालिका आयुक्तांसोबत बैठक झाली होती. तेव्हा कारवाई करणार नाही, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. मात्र, आज सकाळी ही कारवाई सुरु झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

    आंबिल ओढा परिसरातील या 100 गुंठ्याच्या प्लॉटवर शहरातील अनेक बिल्डर्संची नजर असल्याचा आरोप नागरिकांनी केली. महापालिकेने कोणतीही नोटिस दिली नसल्याने ही कारवाई बेकायदा असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. गेली पन्नास वर्षे लोक राहत असून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न झाला नाही. पण, महापालिका कारवाई करत असल्याचाही आरोप केला जात आहे.

    पुनर्वसन व्हायला हवे : खासदार गिरीश बापट

    दरम्यान, ही कारवाई अचानक केली जात नाही. पुराची परिस्थिती लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येत आहे. फक्त या लोकांचे पर्यायी पुनर्वसन केलं व्हायला हवे, असे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितलं.

    Anti-encroachment action in Ambil-Odha area of ​​Pune; Attempted self-immolation of angry citizens

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!