• Download App
    अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; विशेष न्यायालयाचे आदेश ।Anil Deshmukh remanded in judicial custody for 14 days; Special court order

    अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; विशेष न्यायालयाचे आदेश

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट आणि बार चालकांकडून 100 कोटी रुपयांची वसुली करण्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे पवार सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Anil Deshmukh remanded in judicial custody for 14 days; Special court order

    त्यांच्या ईडी कोठडीची मुदत आज संपली त्यामुळे त्यांना ईडीने न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाची सुनवणी घेऊन अनिल देशमुख यांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले.

    100 कोटींच्या वसुली प्रकरणात तसेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांची चौकशी आणि तपास सक्तवसुली संचालनालय करीत आहे. 1 नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख यांना अटक केली. त्यानंतर सहा दिवस त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले. काल त्यांच मुलगा ऋषिकेश देशमुख याला ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. परंतु तो हजर झाला नाही.

    आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख यांना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

    Anil Deshmukh remanded in judicial custody for 14 days; Special court order

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनाेज जरांगेंचा अडेलतट्टूपणा कायम, आझाद मैदानातून उठणार नसल्याची भूमिका

    मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; मुंबई पोलिसांनी जारी केली ट्रॅफिक ॲडव्हायझरी!!

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला