• Download App
    अमेरिका : संगीत महोत्सवात भीषण अपघात, किमान आठ जणांचा मृत्यू । USA: At least eight people die in a horrific accident at a music festival

    अमेरिका : संगीत महोत्सवात भीषण अपघात, किमान आठ जणांचा मृत्यू

    घटनास्थळी बचावकार्य सुरूच आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही, असे अमेरिकन अधिकारी सॅम्युअल पेनिया यांनी सांगितले. USA: At least eight people die in a horrific accident at a music festival


    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंगटन : अमेरिकेत सुरू असलेल्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये एक दुर्घटना घडली आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.घटनास्थळी बचावकार्य सुरूच आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही, असे अमेरिकन अधिकारी सॅम्युअल पेनिया यांनी सांगितले.



    अनियंत्रित गर्दीमुळे हा अपघात झाला

    अमेरिकन अधिकारी या घटनेचे मुख्य कारण सांगण्यास नकार देत असले तरी, मिळालेल्या माहितीनुसार, गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे हा अपघात झाला. सांगीतले जात आहे की, संगीत महोत्सवामुळे स्टेजच्या जवळ जाणाऱ्या लोकांवर नियंत्रण नव्हते.यादरम्यान गर्दी अनियंत्रित झाली, त्यामुळे लोक एकमेकांच्या अंगावर आले. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. जवळपास ३०० लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये आतापर्यंत १७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये ११ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

    USA: At least eight people die in a horrific accident at a music festival

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Foreign Universities : 15 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची मंजुरी; ऑगस्टपासून पहिली बॅच; परदेशी पदवी मिळेल, शिक्षणाचा खर्च होईल 30-40% कमी

    Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतरवर उपोषणाला सुरुवात केली; NEET पेपरफुटीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

    Prashant Kumar Dutta : आसामच्या माजी डीआयजींची 53 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; 7.23 कोटी उत्पन्नाच्या तुलनेत 79 कोटींची संपत्ती