विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील धरणांमधून पाण्याचा योग्य विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणाच्या पाण्याबाबतही नियंत्रण ठेवले जात आहे. प्रशासन मोठ्या जोमाने काम करत आहे, आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. पुढील २-३ दिवसात पावसाची तिव्रता कमी झाली तर पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात होईल आणि मोठे संकट टळेल, असे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत राजाराम पाटील यांनी सांगितले. Almatti Dam Water discharge control : Jayant Patil
राज्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडत आहे. प्रामुख्याने धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणात पाणी वाढले तसेच सांगली, कोल्हापूर आणि अन्य ठिकाणी नद्यांनी पूर रेषा, धोक्याची पातळी ओलांडली. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी कोयना, राधानगरी, अलमट्टी येथील पाणी विसर्ग या मुद्यावर माहिती दिली आहे.
- महाराष्ट्रातील धरणांमधून पाण्याचा योग्य विसर्ग सुरू
- अलमट्टी धरणाच्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण
- पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु
- पावसाचा जोर कमी होताच परिस्थिती आटोक्यात
- पाण्याचा निचरा होण्यास लवकरच सुरुवात होईल