• Download App
    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी ८७ कोटी रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेकडे सूपूर्द|A check of Rs. 87 crore has been handed over to Pune Municipal Corporation for land acquisition of Adyakrantiguru Lahuji Vastad Salve Memorial.

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी ८७ कोटी रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेकडे सूपूर्द

    संगमवाडी येथील आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या नियोजित स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाकडील ८७ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.A check of Rs. 87 crore has been handed over to Pune Municipal Corporation for land acquisition of Adyakrantiguru Lahuji Vastad Salve Memorial.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संगमवाडी येथील आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या नियोजित स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाकडील ८७ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.There is proposal of Lahuji salve smarak in sangamwadi area, pune municipal corporation get ८७ cr rupees for this work

    स्मारकाबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, समाज कल्याण उपायुक्त रवींद्र कदम पाटील,



    सहायक आयुक्त समाज कल्याण संगीता डावखर, स्मारक समितीचे अध्यक्ष विजय बापू डाकले, समितीचे सदस्य बाळासाहेब भांडे, रवी पाटोळे, रामभाऊ कसबे, डॉ. राजू अडागळे, शांतीलाल मिसाळ आदी उपस्थित होते.

    यावेळी आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाबाबत जागेचे भूसंपादन, स्मारकाचा नियोजित आराखडा, बांधकाम, त्याकरिता लागणारा निधीबाबत चर्चा करण्यात आली. भूसंपादनाची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

    A check of Rs. 87 crore has been handed over to Pune Municipal Corporation for land acquisition of Adyakrantiguru Lahuji Vastad Salve Memorial.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा