• Download App
    कोविड मृत्यु भरपाईसाठी मुंबईत ३५ हजार अर्ज; कुटुंबियांना ५० हजार रुपये सहाय्य । 35,000 applications for Covid death compensation in Mumbai, Rs 50,000 assistance to families

    कोविड मृत्यु भरपाईसाठी मुंबईत ३५ हजार अर्ज; कुटुंबियांना ५० हजार रुपये सहाय्य

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोविड मध्ये मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी आयोजित जनसुनावणीत प्राप्त ३२८ अर्जांपैकी २७३ अर्ज मंजूर झाले. तक्रार निवारण समितीच्या बैठकीत एकूण ३२८ नागरिकांनी सहभाग घेतला. त्यापैकी २७३ अर्ज मंजूर झाले. ३६ नागरिकांचा मृत्यू मुंबई बाहेर झाला असल्यामुळे ते नामंजूर करण्यात आले. १९ नागरिकांचे कागदपत्र नसल्यामुळे पुढील बैठकीत पुन्हा कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. 35,000 applications for Covid death compensation in Mumbai, Rs 50,000 assistance to families

    या अर्जांचा राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. कोविड मध्ये मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना अद्यापपर्यंत आर्थिक मदत न मिळालेल्या नागरिकांची जनसुनावणी महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांसमवेत पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात पार पडली.

    आमदार श्रीमती यामिनी जाधव, उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेते श्रीमती विशाखा राऊत, नगरसेवक अमेय घोले, नगरसेवक अशोक माटेकर, नगरसेवक सचिन पडवळ, नगरसेविका सुवर्णा करंजे, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे उपस्थित होत्या.



    कोविडमुळे मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना सानुग्रह सहाय्य मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात आल्यानंतर तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून नागरिकांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी जनसुनावणी ठेवण्यात आली होती. असल्याचे महापौरांनी सांगितले. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामध्ये मुंबईकरांची फरफट होऊ नये, त्यांना एकाच छताखाली त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे,या उद्देशाने ही जनसुनावणी ठेवण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.

    कोविडने मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांचे सानुग्रह सहाय्य शासनातर्फे देण्यात येते. शासनाने तयार केलेल्या पोर्टलमध्ये मृत्यूमुखी झालेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकांना ऑनलाईन अर्ज करावे लागतात. आतापर्यंत मुंबईसाठी ३५ हजार १३८ अर्ज प्राप्त झाले आहेत.त्यापैकी कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी २१ हजार ४३६ अर्ज मंजूर केले आहेत. मंजूर झालेल्या अर्जांपैकी २२१६ नागरिकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सहाय्य मिळालेले आहे.

    एकूण अर्जापैकी १२ हजार ८७१ अर्ज नामंजूर झाले आहेत. त्यापैकी ०५ हजार ०३ नागरिकांनी तक्रार निवारण समितीकडे अर्ज केले आहेत. अशा व्यक्तींची तक्रार निवारण समितीच्या बैठकीत त्यांची कागदपत्रे तपासून पुढील मंजूर किंवा नामंजूरची प्रक्रिया केली जाते.

    35,000 applications for Covid death compensation in Mumbai, Rs 50,000 assistance to families

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!