• Download App
    Sahar Sheikh’s Father Yunus Sheikh Appears Before Police; Denies Bogus Caste Certifica मुलगी मोठी होतेय म्हणून काहींचा जळफळाट; दोन दिवसात भूमिका स्पष्ट करू, सहर शेखचे वडील आक्रमक; पोलिसांसमोर लावली हजेरीte Charges

    Sahar Sheikh : मुलगी मोठी होतेय म्हणून काहींचा जळफळाट; दोन दिवसात भूमिका स्पष्ट करू, सहर शेखचे वडील आक्रमक; पोलिसांसमोर लावली हजेरी

    Sahar Sheikh

    वृत्तसंस्था

    मुंबई : Sahar Sheikh ठाणे महानगरपालिकेच्या ‘एमआयएम’ पक्षाच्या माजी नगरसेविका सहर शेख यांच्या कथित बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले सहर शेख यांचे वडील युनूस शेख शुक्रवारी अचानक मुंब्रा पोलिस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, “दोन दिवसांत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, विरोधकांना करारा जवाब मिळेल,” असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.Sahar Sheikh

    सहर शेख यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून महापालिका निवडणूक लढवल्याची तक्रार सिद्दिकी अहमद यांनी दाखल केली आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, युनूस शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी असून ते महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आहेत. स्थलांतरित नागरिकांसाठी ‘नमुना १०’ लागू असताना, युनूस शेख यांनी ‘नमुना ८’ चा वापर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याच कागदपत्रांच्या आधारे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवून सहर शेख यांनी ठाणे महापालिकेत विजय मिळवल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.Sahar Sheikh



    मुलगी मोठी होतेय म्हणून अनेकांना जळण

    मुंब्रा पोलिस ठाण्यात सुमारे २० मिनिटे पोलिसांशी चर्चा केल्यानंतर बाहेर पडलेले युनूस शेख पत्रकारांशी बोलताना प्रचंड संतापलेले दिसले. त्यांनी या प्रकरणाला निव्वळ ‘राजकीय स्टंट’ संबोधले आहे. “दोन दिवसांत आम्ही आमची भूमिका कायदेशीररीत्या स्पष्ट करू. जे काही आरोप होत आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. माझी मुलगी राजकारणात मोठी होतेय, हे पाहून अनेकांना जळण होत आहे, त्यातूनच हा त्रास दिला जात आहे,” असे शेख यांनी यावेळी स्पष्ट केले.

    नॉट रिचेबल सहर शेख ‘वानखेडे’वर!

    हे प्रकरण समोर आल्यापासून सहर शेख या नॉट रिचेबल आहेत. मात्र, गुरुवारी त्या चक्क मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा आनंद घेताना दिसल्या. १६ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्याचा एक व्हिडिओ त्यांनी स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

    यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, “जर त्या ‘नॉट रिचेबल’ होत्या, तर मग स्टेडियमवर कशा दिसल्या?” असा प्रश्न विचारला जात आहे. यावर त्यांचे वडील युनूस शेख यांनी आपली भूमिका मांडली. “तिने मॅच पाहायला जाण्यात काय चुकीचे आहे? ती काय पळून गेलेली नाही,” असे म्हणत त्यांनी आपल्या मुलीची पाठराखण केली.

    सहर शेख यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीची चर्चा

    दरम्यान, सहर शेख यांनी आयपीएल सामना पाहयला गेल्यानंतर स्टेडियमच्या गॅलरीतील व्हिडीओ पोस्ट केला आहे. या स्टोरीमध्ये त्यांनी सामन्याच्या व्हिडिओसह गेम ओव्हर असे देखील लिहिले. तसेच तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ, कितनी कहानी बनी कितना तमाशा हुआ..जाने तू कैसी होगी..असे गाणेही स्टोरीला लावलेले आहे. स्टोरीला दिलेले कॅप्शन आणि लावलेले गाणे यावरून सहर शेख यांनी सगळ्या विरोधकांना पुन्हा डिवचल्याचे बोलले जात आहे.

    Sahar Sheikh’s Father Yunus Sheikh Appears Before Police; Denies Bogus Caste Certificate Charges

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ashok Chavan : राजकीय अहंकारातून महिला आरक्षणात विरोधकांचा अडसर:अशोक चव्हाण यांची टीका, केंद्र सरकारच्या भूमिकेचे केले समर्थन

    Jitendra Shelke : भोंदू खरात प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार ठार; शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू

    Amruta Fadnavis : मी बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली होती; नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकारावर बोलताना अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया