• Download App
    Yavat Tension CM Fadnavis Angry Provocative Posts मेळावा झाला म्हणून प्रक्षोभक पोस्टचे स्वातंत्र्य मिळते का

    CM Fadnavis : मेळावा झाला म्हणून प्रक्षोभक पोस्टचे स्वातंत्र्य मिळते का? यवत तणावावर मुख्यमंत्र्यांची नाराजी; अजित पवारांची घटनास्थळी पाहणी

    CM Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : CM Fadnavis पुण्यातील यवत गावात एका आक्षेपार्ह पोस्टवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले होते. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबत दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.CM Fadnavis

    फडणवीस  ( CM Fadnavis ) म्हणाले की, काही लोक जाणूनबुजून तणाव निर्माण करण्यासाठी असे स्टेटस, पोस्ट करतात, परंतु त्यांच्यावर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल. केवळ एखादा मेळावा किंवा कार्यक्रम झाला म्हणून, अशा प्रकारचे प्रक्षोभक स्टेटस पोस्ट करण्याचे स्वातंत्र्य कोणालाही मिळते का? कोणत्याही धर्माविरुद्ध अशा प्रकारे आक्षेपार्ह टिप्पण्या करण्याचा कोणालाही अधिकार नाही. म्हणून, सार्वजनिक मेळाव्या मुळे तणाव निर्माण झाला असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.CM Fadnavis



    मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या हा परिसर पूर्णपणे शांत आहे. व्हिडिओ क्लिप त्याच ठिकाणची आहे की इतरत्र आहे याची पडताळणी करावी लागेल. अशा अनेक प्रकरणांमध्ये छेडछाड केलेले व्हिडिओ देखील समोर येतात. म्हणून, त्या पैलूची देखील चौकशी केली पाहिजे. आमचे एकच आवाहन आहे: सर्वांनी शांतता राखावी आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये. जर कोणी असे केले तर पोलिस त्याच्यावर कठोर कारवाई करतील.

    फडणवीस म्हणाले, मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका बाहेरील व्यक्तीने आक्षेपार्ह स्टेटस पोस्ट केले होते, ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. लोक रस्त्यावर उतरले आणि गर्दीला काही प्रमाणात नियंत्रित करण्यासाठी लाठीमार करावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन्ही समुदायाचे लोक एकत्र बसून चर्चा करत आहेत आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक जाणूनबुजून तणाव पसरवण्यासाठी असे स्टेटस पोस्ट करतात, परंतु त्यांच्यावर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल.

    लोकांचा रोष पाहून बाजारपेठ बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड केली आणि त्यांना आगही लावली. एका आरोपीच्या घराचीही तोडफोड करण्यात आली. तणावपूर्ण वातावरण पाहून यवतमध्ये जवळपासच्या अनेक पोलिस ठाण्यांमधील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

    अजित पवार यांनी घटनास्थळी भेट घेतला आढावा

    पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत येथे दोन गटांत जातीय तणाव निर्माण झाला होता. व्हॉट्सॲपवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे हा वाद भडकला होता. त्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही थेट घटनास्थळी स्थितीचा आढावा घेतला. या वेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    यवतमध्ये मोठा फौजफाटा तैनात

    वास्तविक संतापजनक मोर्चा, बाजारपेठ बंद, रस्त्यावर गर्दी, जाळपोळ आणि नंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. एका व्हॉट्सॲपवरील पोस्टमध्ये पुण्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी जातीय वातावरण बिघडल्यानंतर यवतमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

    Yavat Tension CM Fadnavis Angry Provocative Posts

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !